तुम्हाला कोथिंबीर आवडत नाही? असं म्हणणारे तुम्ही एकटे नाही, सायन्सनं सांगितलं यामागचं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कोथिंबीर आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे, तरी देखील लोकांना ती खायला आवडत नाही. काहींना ती तोंडत आलेली आवडत नाही तर अनेकांना त्याचा वास आवडत नाही.
प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या आपल्या आपल्या सवयी आणि आवडी-निवडी असतात. काही लोकांना आवर्जून एखादा पदार्थ खायला आवडतो र काही लोक एखादा पदार्थ खात नाहीत किंवा जेवणातून त्याला बाजूला ठेवतात. काहींना काही पदार्थांची एलर्जी असते. ज्यामुळे ते खात नाहीत. असाच एक पदार्थ आहे, जो तसं पाहाता आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे, तरी देखील लोकांना तो खायला आवडत नाही आणि तो पदार्थ म्हणजे कोथिंबीर.
advertisement
काहींना कोथिंबीरची हिरवीगार चव आणि सुगंध अप्रतिम वाटतो, यामुळे जेवण किंवा तो पदार्थ आवडीने खाण्याची इच्छा होते, तर काहींसाठी तो अनुभव अगदीच विचित्र असतो. म्हणजे लोकांना त्याचा वास आवडत नाही आणि तोंडात त्याचा पाला आला तर आणखी विचित्र वाटतं. पण हा फरक फक्त आवडी-निवडींचा नसून, त्यामागे आपल्या शरीरातील लपलेली जनुकीय रचनाही मोठी भूमिका बजावत असते.
advertisement
advertisement
TOI च्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला कोथिंबीर खाल्ल्यावर साबणासारखी चव येत असेल, तर यामागे तुमची जेनेटिक्स कारणीभूत असू शकते. आपल्या शरीरात सुगंध ओळखण्यासाठी शेकडो रिसेप्टर जीन असतात. संशोधनानुसार ज्यांना कोथिंबीर नकोसा वाटतो, त्यांच्या शरीरात OR6A2 नावाचा ओल्फॅक्टरी रिसेप्टर जीनचा वेगळा प्रकार आढळतो. हा जीन अल्डिहाइड नावाच्या केमिकल्ससाठी अतिसंवेदनशील असतो. धनियामध्येही हे अल्डिहाइड असतात; आणि हेच यौगिक साबण किंवा क्लीनिंग प्रॉडक्ट्समध्येही वापरले जातात. त्यामुळे या जीन असलेल्या लोकांच्या मेंदूला कोथिंबीरचा वास थेट ‘साबणासारखा’ वाटतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मानव विकासाच्या इतिहासाकडे पाहिले तर प्राचीन काळातील माणसं चव आणि वासावरून अन्न निवडत असत. जे पदार्थ कडू, तीव्र किंवा अज्ञात असत, त्यांना ते संभाव्य धोक्याचं चिन्ह मानत. याच कारणामुळे काही लोक नैसर्गिकरित्या धनिया, पुदीना किंवा तुळशीसारख्या तीव्र वासाच्या पानांपासून सुरुवातीला दूर राहू शकतात. मात्र वयानुसार ही चव हळूहळू आवडूही लागते.


