CSMT रेल्वे स्थानकावरून चिमुकलीचे अपहरण, पोलिस पथक कामाला लागले तरी सापडेना; पोलिसांनी एक ट्रिक वापरली अन् शोध लागला!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मराठी भाषेमुळे एक बेपत्ता चिमुकली सापडल्याची घटना उत्तर प्रदेशामध्ये घडली आहे. पण त्या चिमुकलीचं अपहरण मुंबईतून करण्यात आलं होतं. नेमकं ते अपहरण केव्हा करण्यात आलं? कोणी केलं? पोलिसांनी त्या चिमुकलीचा शोध कसा घेतला? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया...
मराठी भाषेमुळे एक बेपत्ता चिमुकली सापडल्याची घटना उत्तर प्रदेशामध्ये घडली आहे. पण त्या चिमुकलीचं अपहरण मुंबईतून करण्यात आलं होतं. नेमकं ते अपहरण केव्हा करण्यात आलं? कोणी केलं? पोलिसांनी त्या चिमुकलीचा शोध कसा घेतला? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया...
मे महिन्यामध्ये सोलापूरमधील एक कुटुंब मुंबई फिरायला आलं होतं. चार वर्षांची चिमुकली पिंकी (बदलेलं नाव) आपल्या आई- वडिलांसोबत मुंबई फिरायला आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (Mumbai CSMT) वरून या चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं होतं. तब्बल सहा महिन्यांनंतर त्या चिमुकलीचा मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर पोलिसांनी शोध घेतला. तिचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीतल्या एका अनाथ आश्रमात ही चिमुकली सापडली असून तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
advertisement
आपल्या परिवारासोबत मुंबईमध्ये आलेल्या पिंकीचे 20 मे 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अपहरण करण्यात आले होते. वडिलांच्या उपचारासाठी सोलापूरहून मुंबईला आलेले कुटुंब मुंबईमध्ये असताना अचानक त्यांच्या चार वर्षीय चिमुकलीचं अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्याने त्या चिमुकलीला आमिष दाखवलं आणि लोकलने घेऊन तिला लोकमान्य टिळक टर्मिनसवर नेलं आणि तिथून पुढे भुसावळ, मध्यप्रदेश असा प्रवास करत थेट उत्तर प्रदेशला घेऊन गेला. तेव्हापासून पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठले. एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल तीन वेळा त्यांनी वाराणसी गाठली.
advertisement
पण, तीनही वेळ त्यांना त्या मुलीचा सुद्धा आणि अपहरणकर्त्याचाही शोध लागला नाही. पण पोलिसांना त्या मुलीचा शोध मराठी भाषेच्या माध्यमातून लागला. पोलिसांच्या सात टीमने उत्तर प्रदेशात या चिमुकलीचा कसून शोध घेतला. अनेकदा शोध घेतला तरीही तिचा शोध लागला नाही. “ऑपरेशन शोध”च्या माध्यमातून तिसऱ्यांदा पोलीस पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आलं. यावेळी देखील पोलिसांनी स्थानिक पोलीस आणि जीआरपीची मदत घेतली आणि रेल्वे स्थानक तसेच वाराणसी जवळील गर्दीच्या ठिकाणी चिमुकलीचे फोटो लावले. ते फोटो पाहूनच वाराणसीतल्या एका स्थानिक पत्रकाराने एक मराठी मुलगी हरवल्याचे वृत्त प्रसारित केले होते.
advertisement
तो फोटो पाहून त्या पत्रकाराने पोलिसांना अनाथाश्रमातील मराठी बोलणाऱ्या एका चमुकलीविषयी सांगितलं. माहिती मिळताच तत्काळ पोलिसाचं पथक अनाथाश्रमात गेलं. चिमुकलीचा फोटो तिच्या आईवडिलांना पाठवला आणि त्यांनी क्षणात आपल्या पोटच्या पोरीला ओळखलं. उत्तर प्रदेशतल्या काशीमध्ये एका अनाथाश्रमात पोलिसांना ही चिमुकली सापडली. म्हणून आश्रमात तिला काश्वी नाव ठेवण्यात आले. आश्रमाने तिचं आधार कार्ड बनवून तिला शाळेत देखील घातलं होतं. पोलिस या चिमुकलीला घेऊन मुंबईला आले आणि तिला तिच्या आई वडिलांच्या हाथी सोपवलं. आपल्या पोटच्या पोरीला सुखरूप परत आणल्याबद्दल आई वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 3:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
CSMT रेल्वे स्थानकावरून चिमुकलीचे अपहरण, पोलिस पथक कामाला लागले तरी सापडेना; पोलिसांनी एक ट्रिक वापरली अन् शोध लागला!


