खासदाराचा लेक पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक, घराणेशाहीच्या प्रश्नावर श्रीरंग बारणेंची गोची
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे देण्यात आली आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेने ज्यांच्यावर सोपवली आहे, ते मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत.
जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रमुख नेत्यांवर महापालिका निवडणुकीसंबंधी प्रभारी, निरीक्षक आदी पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी बारणे यांच्यावर आहे. मात्र मुलाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी बारणे प्रयत्नशील आहेत.
advertisement
मुलाला तिकीट दिले तर सामान्य शिवसैनिकांवर अन्याय होईल, बारणेंनी पोराच्या कामाचे गोडवे गायले
बारणे यांच्या सुपुत्राला तिकीट मिळाले तर संबंधित प्रभागात अनेक वर्षांपासून उमेदवारीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिवसैनिकांवर अन्याय होईल अशी चर्चा आहे. याबाबत खासदार बारणे यांना प्रश्न विचारला असता, कुणावरही अन्याय होणार नाही असे म्हणत त्यांनी मुलाने पक्षासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. घराणेशाहीच्या प्रश्नावर मात्र श्रीरंग बारणेंची गोची झाली.
advertisement
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार, बारणेंचे अप्रत्यक्षपणे भाजपला चॅलेंज
दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व जागा लढण्याची तयारी केली असून प्रशासकीय काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला देखील आव्हान दिले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष ताकदवान आहेत. राज्यातील सत्ताधारी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढतात की युती करतात, हे अजून स्पष्ट झालेले नसले तरीही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पिंपरीत राष्ट्रवादी-भाजप आणि सेना वेगवेगळे लढू शकतात.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
November 15, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खासदाराचा लेक पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक, घराणेशाहीच्या प्रश्नावर श्रीरंग बारणेंची गोची


