IPL Retention 2026 : मुंबईची साथ सोडताच अर्जुनचा अवतार बदलला, आता लक्ष्य भेदणार

Last Updated:

अर्जुन तेंडुलकरने मुंबईची साथ सोडताच आता त्याने एक इमोशनल पोस्ट लिहली आहे.या पोस्टमध्ये लावलेल्या फोटोमध्ये तो वेगळ्याच अवतारात दिसत आहे.हा अवतार पाहून या हंगामात अर्जून लक्ष्य भेदणार असे दिसत आहे.

arjun tendulkar share emotional post
arjun tendulkar share emotional post
Mumbai Indians Release Arjun Tendulkar : मुंबईने इंडियन्सने लखनऊ सूपर जाएटस सोबत ट्रेड करत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरला देऊ केलं आहे, तर त्याच्या बदल्यात पालघर एक्सप्रेस शार्दुल ठाकूरला ताफ्यात घेतलं आहे.त्यामुळे अर्जुन तेंडुलकरने मुंबईची साथ सोडताच आता त्याने एक इमोशनल पोस्ट लिहली आहे.या पोस्टमध्ये लावलेल्या फोटोमध्ये तो वेगळ्याच अवतारात दिसत आहे.हा अवतार पाहून या हंगामात अर्जून लक्ष्य भेदणार असे दिसत आहे.
मुंबईचा निरोप घेतानात अर्जुन तेंडुलकरने एक इमोशनल पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तो लिहतो, "आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद. बॅज घालून संघाचा भाग होणे हा एक सन्मान होता.लखनऊ सूपर जाएंटसमध्ये सामील होण्याची उत्सुकता आहे, लवकरच भेटू, असे त्याने लिहले आहे. अर्जूनच्या या पोस्टवर बहीण सारा तेंडुलकरने कमेंट करत लव्ह यु असे उत्तर दिले आहे.
advertisement
advertisement
या पोस्टसोबत अर्जुन तेंडुलकरने एक स्टोरी ठेवली आहे. लखनऊ सूपर जाएटसची ही स्टोरी होती जी त्याने स्वत:च्या स्टोरीवर ठेवली होती. या स्टोरीमध्ये अर्जुन तेंडुलकर धनुष्यबाण घेतलेल्या अवस्थेत दिसत आहे.तसेच या फोटोवर वेलकम अर्जून तेंडुलकर असा मजकूर लिहला गेला आहे. त्यामुळे ही पोस्ट शेअर करून लखनऊने अर्जुन तेंडुलकरच संघात स्वागत केलं आहे.
advertisement
advertisement
अर्जुनसाठी मुंबईची खास पोस्ट
"मुंबई इंडियन्स कुटुंबाचा एक मौल्यवान सदस्य असल्याबद्दल धन्यवाद, अर्जुन. लखनऊ सुपर जायंट्ससोबतच्या तुमच्या प्रवासाच्या पुढील अध्यायासाठी एमआयमधील प्रत्येकजण तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या विकासाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तुम्हाला वाढत राहण्याची आणि तुमची छाप पाडण्याची संधी मिळण्याची आम्हाला उत्सुकता आहे," असे मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
advertisement
'या' खेळाडूची मुंबईत घरवापसी
"कोलकाता नाईट रायडर्स सोबत ट्रेड केल्यानंतर आता लेग-स्पिनर मयंक मार्कंडेची मुंबई इंडियन्स संघात घरवापसी झाली आहे. केकेआरने 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलेला मार्कंडे त्याच किंमतीत मुंबईत सामील होईल. मार्कंडेने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात एमआय कडून केली. 2018, 2019 आणि 2022 मध्ये फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले, त्यानंतर 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि 2023 आणि 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला.त्याने 37 आयपीएल सामने खेळले आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत," असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Retention 2026 : मुंबईची साथ सोडताच अर्जुनचा अवतार बदलला, आता लक्ष्य भेदणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement