Health Tips: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास होईल कमी, आहारात समावेश करा हे पदार्थ
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पाऊस पडला की, वातावरणात आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे वात व्याधी असणाऱ्या रुग्णांना त्रास होण्यास सुरुवात होते. काही वेळा त्रास इतका वाढतो की, रुग्णांना हालचाल सुद्धा करता येत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वात व्याधी असणाऱ्या रुग्णांनी पावसाळ्यात थंड पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर घरातील कामे करताना सुद्धा थंड पाण्यासोबत जास्त संपर्क येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकळून पिणे सुद्धा सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर आंघोळीला सुद्धा गरम पाणी घ्यायला पाहिजे. थंड पाण्यासोबत संपर्क कमी झाला की, वात व्याधी नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल.
advertisement
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागात सूज आली असेल किंवा दुखत असेल आणि याला 7 दिवसांच्यावर दिवस झाले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या काही टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा वात आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीरात काही बदल जाणवल्यास किंवा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. धीरज आंदे यांनी सांगितले.