Inspiring Story: चित्रपटापेक्षा भारी, ही खरीखुरी लव्हस्टोरी, घरच्यांच्या विरोधात लग्न केलं, आता गावभर कौतुक!

Last Updated:
Inspiring Story: घरची परिस्थिती बेताची, दोघांचं लव्ह मॅरेज आणि कुटुंबीयांचा विरोध अशा कठीण प्रसंगात त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. सीमा आणि सतीश यांची प्रेमकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
1/7
प्रेमात एकमेकांची भक्कम साथ असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढत यशस्वी जीवन जगता येतं. अशीच काहीशी प्रेम कहाणी बीड जिल्ह्यातील सतीश आणि सीमा या राठोड दाम्पत्याची आहे. घरची परिस्थिती बेताची, दोघांचं लव्ह मॅरेज आणि कुटुंबीयांचा विरोध अशा कठीण प्रसंगात त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. मिळेल ते काम करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं आणि घवघवीत यश मिळवलंय.

advertisement
2/7
सतीश आणि सीमा राठोड असं या बीडमधील वडवणीच्या दाम्पत्याचं नाव आहे. महाविद्यालयीन जीवनात असतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, घरच्यांनी या नात्याला विरोध केला. तेव्हा सतीश आणि सीमा यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून विवाह केला.

3/7
प्रेमविवाह केल्यानंतर त्यांना घरातून बाहेर राहावं लागलं. पुण्यात राहून त्यांनी मिळेल ते काम केलं. अशातच कोरोनाचं लॉकडाऊन आलं आणि संकटामागून संकटे येत राहिली. तरीही सीमा आणि सतीश यांनी संकटातून मार्ग काढत आपलं शिक्षण सुरूच ठेवलं.

4/7
घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही त्यांनी शिक्षणाचा ध्यास आणि सरकारी नोकरी मिळवण्याची जिद्द सोडली नाही. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतलं. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी दोघांनीही सुरुवातीच्या काळात कंपनीत पूर्णवेळ नोकरी केली आणि उरलेला वेळ अभ्यासाला दिला.

5/7
लग्नानंतर तब्बल पाच वर्षांनी या संघर्षाला फळ मिळालं. काही महिन्यांपूर्वी सतीश राठोड यांची निवड माजलगाव येथील पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या मेहनतीचं पहिलं मोठं यश होतं.

6/7
सीमा आणि सतीश यांच्या यशाची ही गोष्ट इथेच थांबली नाही. सतीश यांच्या यशानंतर सीमा राठोड यांनीही सरकारी नोकरी मिळवली. नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागामध्ये विद्युत सहाय्यक म्हणून त्यांची निवड झाली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

7/7
अनेकदा परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्याकडे रिक्षाच्या भाड्यासाठी सुद्धा पैसे नसायचं. मात्र अशा अनेक अडचणींवर खंबीरपणे मात केली. दिवसरात्र मेहनत घेतली पण शिक्षण सोडलं नाही, असं सीमा सांगतात. जिथे इच्छाशक्ती आणि जिद्द असते तिथे मार्ग नक्की सापडतो हे सतीश आणि सीमा यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement