Bhendval prediction : भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, यावर्षी कसा असणार पाऊस? राजाबाबतही केलं मोठं भाकीत

Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीतील भाकीत जाहीर झालं आहे. पाऊस, पीकं आणि राजकीय विषयांवर देखील भविष्यवाणी करण्यात आली आहे. राहुल खंडारे, प्रतिनिधी
1/7
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीतील भाकीत जाहीर झालं आहे. यावर्षी पीक, पाऊस चांगला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाचा राजा कायम असणार आहे. तर देशावर कोणतंही आर्थिक किंवा परकीय संकट येणार नसल्याचं या भाकीतामध्ये म्हटलं आहे.

advertisement
2/7
सर्वात महत्वाचे म्हणजे या घट मांडणीतील पुरी ही जैसे थे आहे. पुरी हे पृथ्वीचे प्रतीक असल्याने पृथ्वीवर नैसर्गिक संकट येणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

3/7
विदर्भातील असंख्य शेतकरी याच घटमांडणीच्या आधारे खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करत असतात. हे भाकीत ऐकण्यासाठी दूरवरून शेतकरी येत असतात. यावर्षी पिकांची परिस्थिती साधारण सांगण्यात आली आहे.

4/7
या घट मांडणीत गावाच्या पूर्वेस एका शेतात अठरा प्रकारची धान्ये एका गोलाकार आकारात ठराविक अंतरावर ठेऊन या गोलाच्या मध्यभागी एक खड्डा तयार करून त्यात चार मातीचे गोळे ठेऊन त्यावर एक पाण्याची घागर ठेऊन त्यावर पुरी, करंजी, पान सुपारी ठेवण्यात येते.

5/7
प्रत्येक वस्तू एका प्रतिकाप्रमाणे वापरली जाते. अक्षय तृतीयेची रात्र या घटमांडणीवरून गेल्या नंतर या घटात झालेल्या बदलांच्या आधारे देशातील पीक-पाणी राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती यासह विविध विषयांसंदर्भात अंदाज वर्तविला जातो.

6/7
आज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस या घटमांडणीत झालेल्या बदलाच्या आधारे भाकीत वर्तवण्यात आलं आहे. या भाकीतानुसार हे वर्ष सर्वसाधारण जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

7/7
भेडळवळच्या भाकीतानुसार यावर्षी जुनमध्ये कमी पाऊस, जुलैमध्ये सर्वसाधार, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस, सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस, तसेच अकवाळी पाऊस देखील होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement