Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकट, ताशी 40 किमीने वारे वाहणार, विजा कडाडणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला असून मराठवाड्यात देखील धो धो सुरूच आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने 6 जिह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानात बदल झाल्याने काही ठिकाणी थंड तर काही दमट वातावरण निर्माण झाले आहे. आज 28 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा 'येलो अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. तर उर्वरित 2 जिल्ह्यांत सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरसह, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना सतर्कतेचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या काळात येथे विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच 30-40 किमी ताशी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात सामान्यतः हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 114 मध्यम व लघुप्रकल्पांत 60.84 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांची क्षमता 4.60.326 दलघमी असून 247.399 दलघमी उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी याच वेळी या प्रकल्पांत अवघा 28 टक्के साठा होता. 3 मध्यम व 16 लघु, असे 19 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. बोरदहेगाव मध्यम प्रकल्प कोरडाठाक असून वाकोद प्रकल्पात अवघा 5 टक्के साठा आहे.
advertisement


