Weather Alert: 24 तास पावसाचे, मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी पूर्ण दिवस ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणात गारवा देखील मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळच्या वेळेला रिमझिम पाऊस झाला आणि दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसाची स्थिती पुढील 24 तास राहणार असल्याची शक्यता आहे. 48 तासानंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.


