Weather Alert: मराठवाड्यात हवा बदलणार, 24 तासांसाठी पुन्हा अलर्ट, शनिवारी या जिल्ह्यांत धो धो पाऊस

Last Updated:
Marathwada Rain: गेल्या काही दिवसांत मराठाड्यात पावसाचा जोर वाढला होता. आता मात्र पुन्हा हवापालट होण्याची शक्यता असून हवामान विभागाने 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांत हवामान विभागाकडून वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यात शुक्रवारी 6 जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला होता. आता मात्र हवामानात थंडावा निर्माण झाला असून काही बदल जाणवत आहे, त्यामुळे पाऊस ओसरला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

3/5
आज 30 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह, जालना आणि परभणी या 3 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच 30-40 किमी ताशी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.

4/5
बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांत सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. आता मात्र पावसाळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

5/5
मराठवाड्यातील सर्वात मोठे मानले जाणारे जायकवाडी धरण व वरील भागात गेल्या 48 तासांपूर्वी पावसाचा जोर वाढला असल्याने पाणीसाठा 98.62 टक्क्यांवर पोहेचला आहे. गुरुवारी आवक 84 हजार 160 क्युसेकने येत असल्याने येणारी आवक बघून काल धरणाचे 18 दरवाजे तीन फूट उंचावून गोदावरी नदीच्या पात्रात 54 हजार 160 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. आवक बघून रात्रीतून विसर्ग कमी-अधिक करण्यात येईल, असे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement