advertisement

Weather Alert: मराठवाड्यात हाडं गोठवणारी थंडी, इथं पारा 10 अंशांच्या खाली, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather update: मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत पारा घसरला आहे. बुधवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
यंदा पावसाने कहर केल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान थंडी देखील सतावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह काही भागात थंडीची लाट असून मराठवाड्यात देखील पारा घसरला आहे. आज बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वातावरण पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीच्या प्रमाणात मागील काही दिवसांच्या तुलनेत वाढ जाणवू शकते. येथे कमाल तापमान सुमारे 28.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 10.0 अंश सेल्सिअसवर स्थिरावेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. जालना जिल्ह्यात मात्र दिवसभर अंशतः ढगाळ परिस्थिती राहण्याचे अनुमान आहे. कमाल तापमानात जवळपास दोन अंशांची घसरण होऊ शकते, त्यामुळे थंडी अधिक तीव्र भासणार आहे. परभणी जिल्ह्यातही आकाश स्वच्छ राहून पहाटेच्या वेळेला गारवा वाढणार आहे.

3/5
बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज असून तापमानात थोडी घसरण होईल. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढेल. येथे दिवसाचे कमाल तापमान अंदाजे 27 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 14.1 अंश सेल्सिअस आसपास असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. येथील सकाळ-संध्याकाळ अधिक गारठलेली राहू शकते. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत प्रामुख्याने आकाश स्वच्छ राहील. वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील कोरडेपणा तसेच काही ठिकाणचे ढगाळ वातावरणामुळेही तापमानात घसरण होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/5
लातूर जिल्ह्यात तापमानातील घट अधिक जाणवेल. तसेच वातावरण कोरडे राहणार असून थंडीची झळ तीव्र असेल. बुधवारी लातूरमध्ये कमाल तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. धाराशिव जिल्ह्यातही तापमान घसरण्याची चिन्हे असून आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेला गारठा वाढण्याचा अंदाज आहे.

5/5
मराठवाड्यात गेल्या आठवड्यात थंडीची तीव्रता थोडी कमी झाली होती; मात्र आता वातावरणातील अनियमित बदलांमुळे पुन्हा तापमान घसरत आहे. आज 3 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा जारी केला नसला तरी थंडीचा जोर कायम राहणार आहे. सकाळ-संध्याकाळच्या थंड वाऱ्यामुळे गारवा अधिक जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement