Rain Alert: मराठवाड्यात हवापालट, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांत काय स्थिती? आजचा हवामान अंदाज
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील काही दिवस तुरळक हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
advertisement
मागील काही दिवसांपासून अंशतः घटलेले छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान पुन्हा 34 अंश सेल्सिअस इतके असेल. तापमान वाढल्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवणार आहे. पुढील 24 तासात संभाजीनगरमध्ये आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये पावसाचा जोर परत वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
advertisement
मराठवाड्यातील जालना, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमान वाढ झालेली आहे.
advertisement











