Weather Alert: दुपारनंतर नवं संकट, संभाजीगरमध्ये सर्व सिग्नल बंद राहणार, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Weather: मराठवाड्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
1/7
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानात वाढ झालेली आहे. बहुतांश जिल्हामध्ये तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या वरती गेलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये देखील उष्ण व दमट वातावरणात राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील सांगण्यात आलेली आहे.

advertisement
2/7
परभणी, हिंगोली, नांदेड येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने, तसेच जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत दुपारनंतर गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

3/7
छत्रपती संभाजीनगर किमान तापमान हे 25 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कमाल तपामान हे 43 अंश सेल्सिअस एवढे असेल. संभाजीनगर शहरातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच या ठिकाणी तापमानामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/7
छत्रपती संभाजी नगर शहरात पारा हा आता 44 अंशांपर्यंत जात आहे. उन्हात थांबावं लागू नये म्हणून शहरातील पोलिसांनी सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत सर्व सिग्नल बंद राहतील.

5/7
मराठवाड्यात सर्वाधिक तापमाना परभणीत नोंदवले जाण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घ्यावी. बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस असेल.

6/7
धाराशिव आणि जालना जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 42 अंश सेल्सिअस असेल. तसेच मे महिन्यामध्ये या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

7/7
नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरामध्येच राहावे. वाढते तापमान आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची व इतर पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement