पतीच्या निधनानंतर हाती घेतलं स्टेअरिंग, टमटम चालवून ती मुलांना शिकवतेय
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पतीच्या अकाली निधनानंतर मोहिनी या प्रवासी वाहतूक करणारं टमटम चालवून दोन मुलांचं शिक्षण करत आहेत.
भारतात विधवा महिलांचे प्रश्न ही गंभीर समस्या आहे. पतीच्या अकाली निधनानंतर अनेक महिलांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. अनेक महिला या संघर्षाला सामोरं जात जिद्दीनं कुटुंबाचा भार वाहतात. अशीच कहाणी धाराशिवमधील उमरगा येथील मोहिनी चव्हाण यांची आहे.पती विष्णुकांत चव्हाण यांच्या निधनानंतर प्रवासी वाहतूक करणारं टमटम चालवून त्या कुटुंब सांभाळत आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
advertisement
उमरगा येथील विष्णुकांत चव्हाण हे प्रवासी वाहतूक करणारं टमटम चालवायचे. पत्नी मोहिनी यांनाही वाहन चालवण्याचा छंद होता. त्यामुळे त्याही वाहन चालवायला शिकल्या. विष्णुपंत यांचं अकाली निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी पत्नी मोहिनी यांच्यावर आली. छंद म्हणून शिकलेली वाहन चालवण्याची कला कामी आली आणि मोहिनी यांनीही परंपरागत प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पतीच्या निधनानंतर मोहिनी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी टमटम चालवण्याचाच मार्ग पत्करला. कोरोना काळात, तसेच एसटीचा संप असतानाही त्यांनी पतीसोबत टमटम चालवले होते. पण कधीकाळी छंद म्हणून वाहन चालवणाऱ्या मोहिनी या आता प्रवासी वाहतूक करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह पाहतात. त्यांना दोन मुले असून ते उमरगा येथील शाळेत शिकत आहेत.
advertisement
advertisement