मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक, एकनाथ शिंदे यांच्या अखेरच्या बैठकीचा विषय काय होता?

Last Updated:
Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज शेवटची प्रशासकीय बैठक घेतली.
1/5
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक घेतली. एकनाथ शिंदे गेल्या तीन-चार दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना घशाचा संसर्ग  झाला आहे.

advertisement
2/5
दिल्लीची बैठक संपवून दोन दिवस मूळगावी दरे येथे आराम केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. रविवारी ते ठाण्याच्या निवासस्थानी आले, दोन दिवस आराम केला. परंतु तरीही त्यांना बरे वाटत नसल्याने आज त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन वैद्यकीय चाचण्या केल्या.  तेथून ते थेट वर्षा बंगल्यावर आले.

3/5
मुंबईतील दादर येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश या बैठकीत दिले.

4/5
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे. येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश याप्रसंगी दिले.

5/5
या बैठकीला दृश्यप्रणालीद्वारे मावळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे हे देखील व्हीसीद्वारे उपस्थित होते.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement