Nepal Bus Accident : 26 मृतदेह येणार, विमानतळावर 26 रुग्णवाहिका पोहोचल्या, काळीज धस्स करणारे जळगावातले PHOTOS

Last Updated:
Nepal Bus Accident : नेपाळ येथील दुर्घटनेतील मृतदेह घेण्यासाठी 26 रुग्णवाहिका जळगाव विमानतळावर दाखल झाल्या आहेत.
1/5
नेपाळमध्ये शुक्रवारी एक भीषण दुर्घटना घडली. महाराष्ट्रातील 41 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस एका नदीपात्रात कोसळली. या अपघातात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

advertisement
2/5
देवदर्शनासाठी भाविक नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना बस ही दरीत कोसळली होती. भाविकांचे मृतदेह हे जळगाव विमानतळ येथे दाखल होणार असून हे मृतदेह घेण्यासाठी 26 ॲम्बुलन्सचा ताफा दाखल झाला आहे.

3/5
या ताफ्यासोबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे हेदेखील असणार आहेत. हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

4/5
मृतांमध्ये भुसावळचे चार, तळवेल सात, वरणगाव अकरा, दर्यापूर एक, दोन यूपीचे ड्रायव्हर आणि किन्नर तर एक मुलगी बेपत्ता आहे. एकूण 27 लोकांचा यात जीव गेला.

5/5
आज संध्याकाळपर्यंत नेपाळमधून मृतदेह जळगाव विमानतळावरती येणार आहेत. या अपघातात 16 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे हे नेपाळमध्ये गेलेले आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement