केदारनाथ अन् वैष्णोदेवी, कोल्हापुरात होतंय देशातील 'शिव-शक्ती'चं दर्शन
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापुरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. 139 वर्षे जुन्या गणेश मंडळाने यंदा अनोखा देखावा साकारला आहे.
advertisement
कोल्हापूरच्या रविवार पेठ परिसरातील या मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या गणेशोत्सवात नाविन्य जपले आहे. 2009 सालापासून दख्खनचा राजा स्वरूपातील गणेशमूर्ती आणण्याची परंपरा या मंडळाने जपलेली आहे. त्यामुळे यंदाही प्रभावळीसह 18 फूट उंच अशी विलोभनीय अशी दख्खनचा राजा नाव धारण केलेली गणेशमूर्ती बसवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
दरवर्षी धार्मिक संस्काराची अनुभवती देणारे मंडळ म्हणून ओळख असणाऱ्या या मंडळाने यंदा शिव आणि शक्ती स्थानांचे अध्यात्मिक दर्शन घडवणारा देखावा साकारला आहे. यामध्ये भाविकांना केदारनाथ आणि अमरनाथ या शिवस्थानांचे तर सप्तश्रृंगी आणि वैष्णवीदेवी या शक्तीस्थानांचे दर्शन दख्खनचा राजा मंडपात घेता येत आहे. विशेष म्हणजे या स्थानांच्या 8 फूट उंच आणि 14 फुट लांब असणाऱ्या प्रतिकृतीचे 3D मध्ये दर्शन भाविकांना मिळत आहे.
advertisement
मंडपात प्रवेश केल्यानंतर गणेशमूर्ती कडे जाताना पहिल्यांदाच डाव्या बाजूला अमरनाथ क्षेत्र नागरिकांना पाहायला मिळते. अमरनाथाचे स्थान हे जल-दव बिंदूतून साकार होणारे अदभूत असे दिव्य-लिंग, नाथसंप्रदायाचे प्रमुख पीठ याच ठिकाणी असून शंकराने पार्वतीस अमृततत्वाचा बोध करून दिला होता. प्रतिकृतीमध्ये मागे हिमालय पर्वतरांग आणि पुढे 3D मध्ये अमरनाथ लिंग पाहायला मिळते.
advertisement
पुढे महाराष्ट्रातील वणीची सप्तश्रृंगी माता सर्वांच्या नजरेस पडते. देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्ध मात्रा असणारे स्थान म्हणजेच देवी सप्तश्रृंगी आहे. 7 शिखरांच्या पर्वतावर विराजमान असणारी महिषासुर मर्दिनी दोन्ही बाजुस 9 असे एकूण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली श्री महाकाली म्हणजेच वणीची सप्तश्रृंगी होय. नाथसंप्रदयाची साधना याच ठिकाणातून झाल्याची कथा रूढ आहे. प्रतिकृतीतील मूर्तीकडे पाहिल्यावर भाविकांना खरी मूर्ती पाहिल्याचा भास होतो.
advertisement
दरवर्षी मंडळाकडून गणेशोत्सवामध्ये सामान्य नागरिकांना मंडपात होणाऱ्या देवतांच्या उपासनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. यंदाही पंचायतन यागामध्ये सर्व सामान्य भाविकांना संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. मंडपात सहस्त्र लिंगार्चन, नवग्रह, गणपती, विष्णु, अंबिका, अष्टदिप पालक, सूर्यनारायण यंत्र पूजन, आदींसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत.
advertisement
श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि सरस्वती या 3 देवींच्या स्वयंभू लिंग स्वरूपात एका गुंफेत है वैष्णवीदेवीचे स्थान आहे. कोल्हासूर या राक्षसाला 100 वर्षाचे राज्य देऊन करवीरनिवासीनी अज्ञानस्थळी गेल्याची कथा संपूर्ण भारतात सांगितली जाते. तर याच आसुर कोल्हासुराचा संहार करून देवी गुप्त झालेची कथा वैष्णवीदेवी च्या स्थानी प्रचलित आहे. या दोन्ही कथांची सांगड घातली, तर करवीर निवासिनीचे स्थान हे हिमालयातील वैष्णवीदेवी चे स्थान असल्याचे सांगितले जाते. प्रतिकृतीमध्ये मागे देवस्थान क्षेत्र आणि गुफेतील देवीचे स्थान 3D स्वरूपात पाहायला मिळते.
advertisement
शिवशक्ती स्थानांमध्ये केदारनाथ मंदीर या क्षेत्राची प्रतिकृती उजव्या बाजूला मंडपातून बाहेर पडताना दाखवण्यात आलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच 4 धाम तीर्थापैकी एक असे हे अत्यंत खडतर ठिकाणी वसलेले आहे. याचे दर्शन आपल्याला इथे घेता येते. या प्रतिकृतीतही पर्वतरांगांपासून वेगळे दिसणारे मंदिर आणि मंदिराच्या आतील शिवलिंगाचे दर्शन भाविकांना घेता येते.