Kolhapur Rain: कोल्हापूरला पुन्हा हायअलर्ट, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, हे बंधारे पाण्याखाली!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Kolhapur Rain: हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी शनिवार (दि. 14) पासून मंगळवार (दि. 17) पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
गेल्या 2 दिवसांत कोल्हापुरात पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी शहरात अधूनमधून हलक्या सरी, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा तडाखा असे मिश्र वातावरण पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत शहरात 69 मि.मी. पाऊस, तर जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 39.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.
advertisement
हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी शनिवार (दि. 14) पासून मंगळवार (दि. 17) पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता नदीची पाणी पातळी 13 फूट 5 इंचांवर पोहोचली होती. इचलकरंजी आणि रुई येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
advertisement
शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत होता, तर सायंकाळी जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टमुळे मोठ्या पावसाची अपेक्षा होती; मात्र, पावसाने काहीशी हुलकावणी दिली. शहराच्या काही भागांत हलक्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहिला.
advertisement
गुरुवारी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. याशिवाय शिरोळ, शाहूवाडी, करवीर, आणि कागल तालुक्यांतील काही गावांमध्येही अतिवृष्टीने हाहाकार उडाला. या पावसामुळे शेतजमिनी जलमय झाल्या, तर काही ठिकाणी रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.
advertisement
advertisement
advertisement