Tapola Village: उंच पर्वत, घनदाट जंगल अन् धबधबे... काश्मीरला टक्कर देणारे महाराष्ट्रातील हिडन हिल स्टेशन

Last Updated:
Maharashtra Tourism News: सध्या दिवाळीनिमित्त शाळेतील मुलांना सुट्टी लागली आहे. दिवाळीनंतर अनेक लोकं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी फिरायला जात असतात. आता अशातच जर तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, ही बातमी आवश्य वाचा.
1/6
 जर तुम्हीही सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या मिनी काश्मिरबद्दल सांगणार आहे. हे महाराष्ट्रातील छुपे हिलस्टेशन आहे. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटक थक्क होतात.

advertisement
2/6
 काश्मिरला टक्कर देणारे हे ठिकाण फारसे लोकप्रिय नसून गर्दीपासून अलिप्त आहे. तापोळा हे ठिकाण साताऱ्यामध्ये आहे. महाबळेश्वर ते तापोळा हा घाटरस्ता आहे. तापोळ्याला जाण्यासाठी महाबळेश्वर येथून खाजगी टॅक्सी मिळते. लोकप्रिय नसल्यामुळे इथे फार पर्यटक येत नाहीत.

3/6
 शिवसागर जलाशयाभोवती ट्रेकिंगसाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणापासून अनेक पर्यटक जयगड आणि वासोटा किल्ल्यांवर ट्रेकिंगला जातात. तापोळ्यामध्ये पर्यटक बोटिंगचा आनंद लुटतात. दाट धुके, अंगाला बोचणारी थंडी आणि हिरवीगार गर्द झाडी तापोळ्याच्या सौंदर्यात भर घालते.

4/6
 तापोळ्यामध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला महाकाय असा शिवसागर जलाशय आहे. सोळशी आणि कोयना या दोन नद्या तापोळ्या जवळ एकत्र येतात. कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या शिवसागर जलाशयाच्या काठावर आणि सह्याद्री पर्वतरांगेतील एका सोंडेवर असलेले तापोळा हे त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे मिनी काश्मिर म्हणून ओखळले जाते.

5/6
 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यापासून आग्नेयीस सुमारे 30 किमी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात तापोळा हे गाव वसले आहे. हे एक सुंदर आणि मनमोहक गाव देखील राज्याचा लपलेला खजिना समजले जाते.

6/6
 दरम्यान, तापोळा हे महाराष्ट्रातील महाबळेश्वर शहरापासून सुमारे 28 किमी, पाचगणीपासून सुमारे 44 किमी, कोरेगावपासून सुमारे 98 किमी आणि महाराष्ट्राच्या राजमाचीपासून सुमारे 139 किमी अंतरावर आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement