Maharashtra Weather: सिंधुदुर्गसह 'या' दोन जिल्ह्यांना दिला पावसाचा येलो अलर्ट, बाकी जिल्ह्यांची कशी असेल स्थिती?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
नैऋत्य मानसूने राज्यांमधून माघार घेतल्यानंतर राज्यात बहुतांशी कोरडा हवामान पाहायला मिळत आहे. पोषक हवामान तयार झाल्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट तर नांदेड ला पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील 21 तारखेपासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पाहूयात 20 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विदर्भामध्ये मागील काही दिवसांपासून स्वच्छ हवामान पाहायला मिळालं परंतु 21 ऑक्टोबर पासून विदर्भामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत 21 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर 23 ऑक्टोबर रोजी साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे.