स्वेटर नाही तर छत्री आणि स्कार्फ घेऊन बाहेर पडा! थंडी गायब उकाडा सुरू! या आठवड्यात कसं राहील हवामान?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात दोन वादळांमुळे हवामानात बदल, उकाडा वाढला आहे. 24 25 नोव्हेंबरला हलका पाऊस, 2 ते 7 डिसेंबर अवकाळी पाऊस, 7 डिसेंबरनंतर थंडीची लाट येणार.
ऊन जरा जास्तच आहे, डोक्यावर स्कार्फ, पाण्याची बाटली आणि छत्रीही सोबत ठेवा कारण आता 7 दिवस घामाचा चांगल्याच धारा लागणार आहेत. याचं कारण म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात बदल होत आहेत. दोन वादळांमुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट नसला तरी काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
7 डिसेंबर नंतर पुन्हा राज्यात थंडीची लाट येणार आहे. ला निनासाठी वातावरण अनुकूल असल्याने कडाक्याची थंडी पडणार आहे. त्याआधी मात्र २ वादळांमुळे हवामानात विचित्र बदल झाले आहेत. दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तरेकडे आणि अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे दोन वादळं तयार होत आहेत. पुढच्या 48 तासांत ते डिप डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होऊ शकतं अशी शक्यता आहे.
advertisement


