Election Voting Ink : निवडणुकीत मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई कशी बनते, कुठे बनवली जाते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Municipal Election Voting Ink : निवडणुकीत मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई हात धुतल्यानंतर काही वेळातच गायब झाल्याचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे ही शाई चर्चेत आली आहे. निवडणुकीत वापरली जाणार ही शाई नेमकी कसली असते, कशी बनते, कुठे बनते माहितीये का?
मतदान केलं की तुमच्या डाव्या हाताच्या एका बोटावर शाई लावली जाते. मतदान केल्याची ही निशाणी. निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवी असा यामागील उद्देश. बनावट मतदानाला आळा घालण्यासाठी 1962 पासून मतदारांच्या बोटावर शाई लावण्यास सुरुवात झाली. ही शाई लावल्यामुळे दुबार मतदान होणार नाही असा निवडणूक आयोगाचा दावा होता.
advertisement
प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी पक्क्या शाईचा म्हणजेच इंडेलिबल इंकचा वापर केला जातो. 70 च्या दशकापासून आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेत वापरली जाणारी शाई तयार करण्याची परवानगी या एकाच कंपनीला आहे. आजपर्यंत फक्त एकच कंपनी या शाईचं उत्पादन करत आली आहे. या कंपनीचं भारताच्या निवडणूक प्रक्रियेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) असं या कंपनीचं नाव आहे. ही कर्नाटक सरकारची कंपनी आहे. तिची स्थापना 1937 मध्ये झाली होती. नलवाडी कृष्णा राजा वाडियार यांनी तिची मुहूर्तमेढ रोवली. तिचं मूळ नाव मैसूर लाक फॅक्टरी असं होतं. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने कंपनी ताब्यात घेतली आणि मैसूर लाल अँड पेंट्स लिमिटेड असं तिचं नामकरण केलं. 1989 मध्ये कंपनीने वॉर्निशचं उत्पादन सुरु केलं आणि तिचं नावही बदललं.
advertisement
फायनॅन्शियल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार 10 मिलीच्या एका बाटलीची किंमत 127 रुपये एवढी आहे. या हिशेबाने एक लिटर शाईची किंमत 12,700 रुपये एवढी आहे. म्हणजेच एक मिली किंवा एक थेंब शाईची किंमत 12.7 रुपये एवढी आहे. या शाईच्या एका बाटलीतून 700 मतदारांच्या बोटांवर मतदान केल्याची खूण केली जाते. प्रत्येक बाटलीत 10 मिली शाई असते.
advertisement








