Vidarbha Weather: छत्री घ्यायची की टोपी? विदर्भात पुन्हा दुहेरी संकट, आज 2 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातवर गेल्या काही काळापासून अवकाळी संकट घोंघावत आहे. आज 2 जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील वातावरणात विचित्र बदल घडून आलेत. तापमानात वाढ झाली त्याचबरोबर विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे वातावरणांत दमटपणा निर्माण झाला. विदर्भात गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज 18 एप्रिलला पुन्हा दोन जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. चंद्रपूर आणि यवतमाळ मधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. यवतमाळमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement


