IND vs AUS : कधीच झालं नाही ते घडणार... टीम इंडियावर डाग लागणार, कॅप्टन गिलला उद्या शेवटचा चान्स!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज आधीच गमावली आहे, त्यामुळे आता व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्याचं आव्हान कर्णधार गिलसमोर आहे.
सिडनी : पर्थमध्ये 8 बॉलवर शून्य रन, ऍडलेडमध्ये 4 बॉलवर शून्य रन. दोन सामन्यांमध्ये 12 बॉल खेळल्यानंतरही एक रन काढता आली नाही. ही कामगिरी आहे टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहलीची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीला आतापर्यंत त्याचं खातंही उघडता आलेलं नाही. शनिवारी सिडनीमध्ये सीरिजची शेवटची वनडे खेळवली जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची ऑस्ट्रेलियातल्या जमिनीवरची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असू शकते, त्यामुळे दोघंही त्यांचा ऑस्ट्रेलियातला शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.
टीम इंडियाने वनडे सीरिज आधीच गमावली आहे, त्यामुळे आता व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्याचं आव्हान कर्णधार गिलसमोर आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही व्हाईट वॉश केलेलं नाही. गुरूवारी ऍडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने विजय झाला होता. तर पर्थमध्ये झालेली पहिली मॅच कांगारूंनी 7 विकेटने जिंकली होती.
विराट-रोहितची शेवटची वनडे?
advertisement
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची ही ऑस्ट्रेलियामधील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असू शकते, कारण कोहली 36 आणि रोहित शर्मा 38 वर्षांचा आहे. दोघंही टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, तसंच पुढच्या दोन वर्षात भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा नाही. रोहित-कोहली 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणारा वर्ल्ड कप खेळले, तरी टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये एकही वनडे खेळणार नाहीये.
advertisement
टीम इंडियावर व्हाईट वॉशचा धोका
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया कधीच व्हाईट वॉश झालेली नाही, त्यामुळे सिडनीमध्ये टीम इंडियासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1984 पासून वनडे सीरिज खेळवली जात आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हा त्यांनी 5 मॅचपैकी 3 मॅच जिंकल्या होत्या आणि 2 मॅचचा निकाल लागला नव्हता.
advertisement
सिडनीमध्ये 9 वर्ष विजय नाही
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियाचं रेकॉर्ड खराब आहे. भारतीय टीमने या मैदानात 9 वर्षात एकही वनडे मॅच जिंकलेली नाही. या मैदानात भारताचा शेवटचा विजय 23 जानेवारी 2016 साली झाला होता. यानंतर भारताने सिडनीमध्ये 3 मॅच गमावल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर दोन्ही टीममध्ये 56 मॅच झाल्या, यातल्या 40 मॅच ऑस्ट्रेलियाने तर 14 मॅच भारताने जिंकल्या आणि 2 मॅचचा निकाल लागला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 154 मॅच झाल्या आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाने 86 आणि भारताने 58 मॅच जिंकल्या आहेत आणि 10 सामन्यांचा निकाल लागला नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 4:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : कधीच झालं नाही ते घडणार... टीम इंडियावर डाग लागणार, कॅप्टन गिलला उद्या शेवटचा चान्स!


