'रात गई बात गई', फिजिकल रिलेशनबद्दल ट्विंकल खन्नाचं बोल्ड स्टेटमेन्ट; ऐकून जान्हवी कपूर शॉक, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Twinkle Khanna Kajol : टू मच टॉकच्या एपिसोडमध्ये काजोल, ट्विंकल खन्ना, करण जोहर आणि जान्हवी कपूरने इमोशनल व फिजिकल चिटिंग, लग्नातील प्रेम व कॉम्पेटिबिलिटीवर चर्चा केली.
अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच टॉक' नावाचा शो सध्या चर्चेत आहे. याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये जान्हवी कपूर आणि करण जोहर सहभागी झाले होते. यावेळी पार्टनर, अफेअर्स, इमोशनल, फिजिकल रिलेशन यावरून जान्हवी कपूरला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळीस काजोल आणि ट्विंकल खन्ना असं काही बोलून गेलेत ज्याची सर्वत्र चर्चा होते. "रात गई बात गई, इमोशनल चीट हे फिजिलक चीटपेक्षाही वाईट असतं", असं अभिनेत्री ट्विंकल खन्नाने म्हटलंय
टू मच टॉकच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने जान्हवी कपूरला झालेल्या फसवणूकीकडे दुर्लक्ष करण्याचा आणि लग्न टिकवण्याचा सल्ला दिला. त्यांचा हा सल्ला ऐकून सगळेच शॉक झालेत.
ट्विंकल खन्नाने सांगितले की, फिजिकल चिटिंग तिच्यावर फारसा परिणाम करत नाही, पण इमोशनल चिटिंग अधिक त्रासदायक असतं. शोच्या 'दिस ऑर दॅट' सेगमेंटमध्ये काजोल आणि ट्विंकल खन्नाने करण जोहर आणि जान्हवी कपूरला विचारला की, 'इमोशनल चिटिंग ही फिजिकल चिटिंगपेक्षाही वाईट असते'. इमोशनल चिटिंग असं म्हणत ट्विंकल, काजोल आणि करण एक साइडला गेले.
advertisement
जान्हवी कपूर एकमेव होती जी म्हणाली की, "फिजिकल चिटिंग हे डिल ब्रेक करणारा आहे. तिच्या जोडीदाराने असं केलं तर ते तिच्यासाठी तो डिल ब्रेकअर आहे." यावर ट्विंकल खन्ना पुढे म्हणाली, "आपण 50 च्या दशकात आहोत आणि ती फक्त 20 च्या दशकात आहे. ती लवकरच या सर्कलमध्ये एन्ट्री करेल. आपण जे पाहिले ते तिने पाहिलेले नाही. रात गई बात गई."
advertisement
advertisement
शोच्या 'दिस ऑर दॅट' सेगमेंटमध्ये काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी विचारले की, "लग्नात प्रेम की कॉम्पेटिबिलिटी जास्त महत्त्वाची आहे?" ट्विंकल आणि जान्हवी म्हणाल्या की, "लग्नात प्रेम खूप महत्वाचे आहे." तर करण आणि काजोल असं म्हणाले की, "कॉम्पेटिबिलिटी आवश्यक आहे. लग्नानंतर प्रेम सर्वात आधी संपते. त्यामुळे कॉम्पेटिबिलिटी तर नाते टिकत नाही."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'रात गई बात गई', फिजिकल रिलेशनबद्दल ट्विंकल खन्नाचं बोल्ड स्टेटमेन्ट; ऐकून जान्हवी कपूर शॉक, VIDEO


