Bus Fire: चहूबाजूने आगीचा वेढा तरी कसे वाचले 18 प्रवासी, नंतर झाला धोका 32 प्रवाशांच्या मृत्यूची थरकाप उडवणारी कहाणी

Last Updated:
Bus Fire: किंकाळ्या हवेत विरल्या, बसचा सांगाडा उरला, मृतदेहाचा कोळसा झाला, एका चुकीनं पहाटे 3 वाजता सगळं संपलं, घटनास्थळावरचे थरकाप उडवणारे PHOTO
1/7
काळ आणि वेळ कधी येईल याचा काहीच नेम नाही, साखर झोपेत असताना अचानक अपघात झाला. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटांत जे घडलं हे फार भयंकर होतं. पहाटे 3 वाजताची वेळ अन् सुस्साट खासगी बस चालली होती. अचानक बाइकला धडकली आणि फ्यूल टँकच्या इथे घुसली. त्यानंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं होतं.

advertisement
2/7
आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खाजगी बसला आग लागली. या अपघातात 32 प्रवासी जिवंत जळाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. हैदराबादहून बेंगळुरूला जात असताना बस एनएच-४४ वर एका दुचाकीला धडकली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे बसला लगेच आग लागली.

3/7
या अपघातात बाइकस्वार शिवशंकर यांचाही मृत्यू झाला. बसमध्ये अंदाजे ४० प्रवासी चालक आणि क्लिनर होते. त्यापैकी बरेच जण भाजले. 18 जणांनी उडी मारून जीव वाचवला. आपत्कालीन गेट तोडून स्वत:चा जीव वाचवला. हे प्रवासी गंभीरपणे भाजले असून त्यांना कुरनूल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

4/7
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आग लागली, शॉर्ट सर्किट झाले आणि दरवाजा उघडला नाही. त्यामुळे 32 प्रवासी जळून खाक झाल्याचं सांगितलं जात आहे.

5/7
कुर्नूल रेंजचे डीआयजी कोया प्रवीण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, दोन मुलांसह २१ प्रवासी सुखरूप बचावले. चालक आणि क्लीनर बेपत्ता आहेत. बहुतेक प्रवासी २५ ते ३५ वयोगटातील होते. अपघाताच्या वेळी प्रवासी झोपेत होते, त्यामुळे त्यांना पळून जाता आले नाही. आगीनंतर बसमध्ये शॉर्ट सर्किट झाला, ज्यामुळे दरवाजा जाम झाला.

6/7
अपघातानंतर कुर्नूलचे जिल्हाधिकारी डॉ. ए. सिरी घटनास्थळी पोहोचले आणि हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आल्याची घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०८५१८-२७७३०५, सरकारी रुग्णालय कुर्नूल ९१२११०१०५९, स्पॉट कंट्रोल रूम ९१२११०१०६१, कुर्नूल पोलिस नियंत्रण कक्ष ९१२११०१०७५, जीजीएच मदत कक्ष ९४९४६०९८१४, ९०५२९५१०१० येथून माहिती मिळू शकते.

7/7
पंतप्रधान मोदींनी एक्स वर लिहिले -
पंतप्रधान मोदींनी एक्स वर लिहिले - "कर्नूलमधील अपघात दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत." पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement