Rohit Sharma : सिडनीत रोहित शर्माची फेअरवेल मॅच? एअरपोर्टवरचा गौतम गंभीरचा Video व्हायरल, कॅमेऱ्यात सगळं कैद झालं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Viral Video : एअरपोर्टवर गंभीर, रोहित शर्मा आणि शुभमन गिल एकत्र दिसून आले. त्यावेळी एका कॅमेऱ्यात रोहित शर्माच्या फेअरवेल मॅचची चर्चा होताना दिसली.
Gautam Gambhir to Rohit Sharma : पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दोन्ही खेळाडू स्वस्तात परतले होते. तर दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितने चांगली कामगिरी पण विराटला भोपळा फोडता आला नाही. रोहित शर्मा याने 73 धावांची खेळी केली. अशातच आता सिडनी वनडे रोहित शर्माच्या करियरची अखेरची वनडे आहे की काय? असा सवाल विचारला जात आहे.
रोहित शर्माच्या फेअरवेल मॅचची चर्चा
टीम इंडिया अॅडलेटमधून आता सिडनीमध्ये पोहोचली आहे. सिडनीच्या मैदानावर अखेरचा वनडे सामना खेळवला जाईल. त्यासाठी टीम इंडिया सिडनीत पोहोचली. एअरपोर्टवर गंभीर, रोहित शर्मा आणि शुभमन गिल एकत्र दिसून आले. त्यावेळी एका कॅमेऱ्यात रोहित शर्माच्या फेअरवेल मॅचची चर्चा होताना दिसली. 'रोहित सर्वांना वाटत होते की आज तुझी शेवटची (Farewell) मॅच आहे. तुझा फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) लावून टाक', असं गौतम गंभीर म्हणताना दिसतोय.
advertisement
पाहा Video
Gautam Gambhir to Rohit Sharma
“Rohit, Sabko lag rha tha ki aaj farewell match hai. Photo lagaa do (On Instagram).”
It means Rohit is not going anywhere. This series is not his last series. pic.twitter.com/FsUWFrdvPA
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) October 24, 2025
advertisement
रोहितचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा सामना?
व्हिडिओमधील ऑडिओ अस्पष्ट आहे, परंतु गंभीर, रोहित आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यातील हास्य पाहून ते हलकेफुलके संभाषण असल्याचं दिसून येत आहे. पण सोशल मीडीयावर याचे अनेक अर्थ काढले जात आहे. अॅडलेड सामना रोहितचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा सामना असू शकतो का? असा सवाल विचारला जात आहे. पर्थ येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने फक्त आठ धावा केल्या. पण अॅडलेटवर रोहित चमकला. त्यामुळे रोहित निश्चितच निवृत्ती जाहीर करणार नाही, असं मानलं जात आहे.
advertisement
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.
ऑस्ट्रेलिया संघ - मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवुड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, जॅक एडवर्ड्स, नॅथन एलिस, बेन द्वारशुइस.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : सिडनीत रोहित शर्माची फेअरवेल मॅच? एअरपोर्टवरचा गौतम गंभीरचा Video व्हायरल, कॅमेऱ्यात सगळं कैद झालं!


