advertisement

Nagpur Weather: विदर्भात अचानक बदलली हवा, दुपारनंतर मोठं संकट, 24 तास धोक्याचे!

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 3 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडून येत आहेत. गेल्या काही दिवसांत विदर्भात पावसाचे वातावरण असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. 3 मे रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्याचे चित्र आहे.

2/7
आज 4 मे रोजी सुद्धा विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर असल्याचं दिसून येत आहे. वाढतं तापमान आणि अवकाळीचं संकट यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

3/7
नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

4/7
नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहील. त्याठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अमरावतीमधील कमाल तापमान 42 अंश तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असून इथेही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

5/7
अकोला जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी दुपारी किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. वर्धा, गोंदिया, चंद्रपूर याठिकाणी कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्याठिकाणी आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

6/7
बुलढाणा येथील कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी दुपारी किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. विदर्भात उन्हाचा पारा आणि पावसाच्या धारा यामुळे वातावरणात दमटपणा येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

7/7
पावसाचं वातावरण असूनही उन्हाचा कडाका कायम असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळले पाहिजे. तसेच पावसाचे वातावरण तयार होत असताना घराबाहेर जाण्याची चूक करू नये. भरपूर पाणी प्यावे. आरोग्याच्या समस्या निर्माण होताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement