Nanded Crime : LIC एजंट बनून आला, एकट्या महिलेला पाहून घरात घुसला, मारहाण करत लुटून पसार

Last Updated:
नांदेड शहरात भरदिवसा एलआयसी एजंट बनून आलेल्या एका व्यक्तीने घरात घुसून लुटमार केल्याची घटना घडली आहे. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
1/5
नांदेड शहरातील व्यंकटेश नगर येथे आज भरदिवसा एकाने घरात घुसून लुटमार केल्याची घटना घडली. एलआयसी एजंट बनून आलेल्या एका व्यक्तीने घरात घुसून महिलेला मारहाण करत मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाला.

advertisement
2/5
शुभांगी दोडके असं घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगी ह्या घरात एकट्या होत्या. दुपारी एक अज्ञात युवक एलआयसी एजंट बनून व्यंकटेश नगरमध्ये फिरत होता.

3/5
जाधव याचं घर कुठे आहे असं विचारणा करत होता. त्यानंतर तो इसम शुभांगी दोडके यांच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताचं त्याने महिलेला धक्का दिला आणि आतून कडी लावून घेतली.

4/5
शुभांगी यांच्या गळ्यातील गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विरोध केला. तेव्हा त्याने सोबत आणलेल्या वस्तूने महिलेच्या डोक्यावर वार केला. यात ती महिला रक्तभंबाळ झाल्या. त्यानंतर तो इसम घरातील सोनं आणि मोबाईल घेऊन पसार झाला.

5/5
महिलेने बाहेर येऊन शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कैमेरे तपासले जात आहेत. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, आरोपीचा सुगावा लागला नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement