Amravati Pedha: कमी साखर अन् अप्रतिम चव, पुर्णानगरचे पेढे जगात भारी! अमरावतीत आहे पेढ्यांचं गाव

Last Updated:
Amravati Pedha: अमरावतीपासून 26 किलोमीटर अंतरावर पुर्णानगर हे पेढ्यांचं गाव आहे. पेढ्यांचं गाव म्हणजे नक्की काय? तर या गावातील जास्तीत जास्त लोकं पेढ्यांचा व्यवसाय करतात. फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून पेढा बनवला जातो. त्यात कोणतेही केमिकल वापरलं जात नाही. त्यामुळे येथील पेढा फार प्रसिद्ध झाला आहे.
1/5
पुर्णानगर पेढ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. पूर्वी गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. पण, शेतीत उत्पन्न कमी होत असल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागत होतं. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि त्याच माध्यमातून हा पेढ्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.

advertisement
2/5
25 ते 26 वर्षांपूर्वी गावातील शितल बोबडे यांनी सर्वात अगोदर पेढ्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर गावातील अनेक तरुणांनी हा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिलं. आता पूर्णानगर बस स्टॉपला पेढ्यांची 15 ते 16 दुकानं आहेत.

3/5
पूर्णानगर येथील पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त दूध आणि साखर वापरून हा पेढा बनवला जातो. यात कोणतेही केमिकल किंवा इतर पदार्थ वापरले जात नाही. साखरेचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. 1 लिटर दूध असेल तर 75 ग्रॅम साखर वापरली जाते.

4/5
मोठ्या कढाईमध्ये 20 लिटर दूध तापवून घेतात. त्यानंतर ते 3 तास आटवून घेतलं जातं. परफेक्ट पेढा बनवण्यासाठी दूध 3 तास चुलीवर ठेवावंच लागतं. त्यानंतर त्यात साखर टाकली जाते. ती विरघळल्यानंतर मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं जातं. त्यानंतर तासाभराने पेढा तयार केला जातो.

5/5
मेळघाटामधील पर्यटकांमुळे पेढ्याचा व्यवसाय आणखी वाढीस लागला. पूर्णानगर हे गाव अमरावती परतवाडा रोडवर असल्याने मेळघाटात जाणारे पर्यटक येथे थांबतात आणि पेढ्यांची खरेदी करतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement