अधिवेशन सुरू असतानाच अजित पवार दिल्लीत, शरद पवारांच्या बंगल्यावर दिग्गज नेते पोहोचले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
इंडिया आघाडीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक मंत्री आणि नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
advertisement
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनांचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसह केंद्रातील नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. इंडिया आघाडीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक मंत्री आणि नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
advertisement
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील नागपुराहून दिल्लीत दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना अधिवेशन काळात अजित पवार यांचे दिल्लीला जाणे, अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जाते. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल देखील आहेत.
advertisement










