Heel Pain : टाचांच्या दुखण्यानं चालणं होतं मुश्किल, टाचांच्या दुखण्यावरचे घरगुती उपाय, वेदना होतील कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
टाचांचं दुखणं लवकर बरं करण्यासाठी दोन-तीन दिवस विश्रांती घ्या. दिवसातून दोनदा बर्फाचे पॅक लावा. ऑर्थोपेडिक सोल आणि मऊ चप्पल वापरण्यावर भर द्या.
मुंबई : टाचांच्या दुखण्यामुळे हैराण असाल तर ही माहिती नक्की वाचा. कारण पायाला सूट न होणारी पादत्राणं वापरणं, सतत उभं राहणं, वजन वाढणं आणि जीवनशैलीतल्या इतर काही सवयींमुळे टाचा दुखतात. महिला, खेळाडू आणि जास्त चालणाऱ्यांना या वेदना जास्त जाणवतात.
टाचांच्या दुखण्यामुळे चालणं देखील कठीण होऊ शकतं. सकाळी उठल्यावर टाचेत वेदना होत असतील किंवा बराच वेळ चालल्यानंतर सूज येत असेल, तर पायांची काळजी ताबडतोब घ्यायला सुरुवात केली पाहिजे.
टाचांचं दुखणं आणि सूज कमी करण्यासाठी मोहरीचं तंल, तीळाचं तेल, खोबरेल तेल आणि लसूण तेल हे सर्वोत्तम मानलं जातं. यासाठी तीळ आणि मोहरीचं तेल कोमट करा, त्यात कापूर मिसळा आणि थोडं मालिश करा. झोपण्यापूर्वी मसाज करा आणि पाय झाकून ठेवा.
advertisement
टाचांमधे तीव्र वेदना होत असतील तर पाय उंच करून आराम करा. पंधरा मिनिटं आईस पॅक लावा. स्ट्रेचिंग व्यायाम करा. मऊ, गादी असलेले बूट वापरा. गरज असेल तरच वेदना कमी करणारं जेल लावा.
टाचांच्या दुखण्यावर कोमट पाणी हा चांगला उपाय आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून पंधरा मिनिटं पाय बुडवून ठेवा. यामुळे सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो.
advertisement
टाचेचा मागचा भाग दुखतो कारण अॅकिलीस टेंडोनिटिस. टाचेच्या मागच्या बाजूला असलेल्या टेंडनला सूज येते. बहुतेकदा जास्त धावणं, चुकीच्या आकाराचे शूज घालणं, वजन वाढणं किंवा अचानक व्यायाम सुरू करणं यामुळे दुखू शकतं.
टाचेच्या मागच्या भागात वेदना होतात. अशावेळी टिशूमधे दुखापत होणं, वेदना जाणवणं, हाडांमधे कॅल्शियम जमा होणं अशी कारणं असतात. व्हिटॅमिन डीची कमतरता, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता आणि युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानं टाचा दुखू शकतात. त्यामुळे टाचा दुखत असतील तर ही कारणं असू शकतात हा विचार नक्की करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 9:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heel Pain : टाचांच्या दुखण्यानं चालणं होतं मुश्किल, टाचांच्या दुखण्यावरचे घरगुती उपाय, वेदना होतील कमी







