सांगलीकरांची कल्पनाच भारी! स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना, झाडांतून जपल्या स्मृती!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Sangli History: भारतीय स्वातंत्र्यवीरांना सांगलीत अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. क्रांती स्मृती वनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती झाडांच्या माध्यमातून जपण्यात आल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतींचा आदर करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी स्मारके आणि पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी गावात जिवंत स्मारक उभारण्यात आलंय. इथं थोर हुतात्म्यांच्या स्मृती झाडांच्या रूपात जपल्या जात आहेत. या ठिकाणाला ‘क्रांती स्मृतीवन’ म्हणून ओळखलं जातंय.
advertisement
स्वातंत्र्यलढ्याच्या वीरांनी दिलेल्या प्रेरणेचा आदर करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, हा क्रांती स्मृतीवन निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे. बलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांनी येरळा नदीकाठावरील स्वतःच्या 5 एकर जागेत 20 वर्षांपूर्वी हे स्मृतीवन उभारले आहे. क्रांती स्मृतीवन या नावामागील इतिहास आणि उद्देश जाणून घेण्यासाठी लोकल18ने भाई संपतराव पवार यांच्याशी संवाद साधला.
advertisement
“सन 1942 मध्ये महात्मा गांधींनी ‘करेंगे या मरेंगे’ अशी घोषणा दिली आणि तिथूनच स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी पर्व सुरू झाले. या सुवर्ण पर्वाचा सुवर्ण महोत्सव 1992 साली साजरा करण्यात आला. मात्र, सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला इस्लामपूर, शिराळा आणि कागलमध्ये एकतर्फी प्रेमातून घडलेल्या हत्यांच्या घटनांनी तरुण पिढीची चिंता वाढवली. त्यामुळे इतिहास जागृत करण्याचा निर्णय घेतला,” अंस पवार सांगतात.
advertisement
“वाळवा हे 1942 च्या चळवळीचे प्रमुख केंद्र होते, तेव्हा येथील तरुण स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे होते. या पार्श्वभूमीवर तरुणांना देशासाठी प्रेरणा देण्यासाठी ‘क्रांती स्मृतीवन महाराष्ट्र व्यासपीठ’ तयार करण्यात आले. क्रांतिकारकांच्या नावाने एक-एक वृक्ष लावून त्यांची स्मृती जागवली जाते,” असे संपत पवार सांगतात.
advertisement
advertisement
क्रांती स्मृतीवनात प्रत्येक हुतात्म्याच्या नावाने एक झाड लावण्यात आले असून त्यास क्यूआर कोड दिला आहे. या कोडद्वारे वीरांची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजीत मिळते. या उपक्रमात ‘वन, पर्यावरण आणि सामाजिक संतुलन’ या त्रिसूत्रीच्या आधारावर युवकांना बांधून ठेवण्यासाठी प्रबोधन केंद्र उभारले जात आहे. सांगलीपासून
advertisement
advertisement
advertisement


