1, 2 नाही, 15 हजारांचा दिवसाला निव्वळ नफा! चहाचा व्यवसाय लय फायद्याचा
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
चहा म्हणजे अनेकजणांचा जीव की प्राण, चहा घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही. दिवसभरातही चहाची तल्लफ आली की मग वेळ पुढे सरकत नाही. टपरीवरचा चहा तर खूप लोकांना आवडतो. काहीजण घरातला चहा नाहीतर एका ठराविक स्पॉटवरचाच चहा घेतात. सातारकर सध्या चंदू चहावाल्याच्या भलतेच प्रेमात आहेत. इथला चहा अतिशय फेमस झालाय, परिणामी चंदू चहावाला त्यातून महिन्याकाठी लाखोंची कमाई करतोय. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
advertisement
सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शाहू स्टेडियम परिसरात चंदू चहाचं दुकान आहे. 1972 साली चंद्रकांत शिंदे यांच्या आजोबांनी चंदू चहाची सुरुवात केली. त्यानंतर 1992 साली चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या आजोबांचा चहाचा व्यवसाय नव्या जोमानं, नव्या उमेदीनं सुरू केला. विशेष म्हणजे आजोबांनी जी चहाची चव ठेवली होती, तीच चव कायम ठेवून चंद्रकांत यांनी आजपर्यंत हा व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळला आहे.
advertisement
advertisement
advertisement
इथल्या 1 कप चहाची किंमत आहे 15 रुपये. चंद्रकांत शिंदे हे दररोज 2 हजारांहून अधिक कप चहा विकतात. त्यातून त्यांना दिवसभरात 15 हजार रुपये केवळ नफा मिळतो. परिणामी महिन्याला ते या व्यवसायातून लाखो रुपये कमवतात. चहासोबतच ते वडापाव, भजी, मिसळ अशा वेगवेगळ्या फास्ट फूडची विक्रीदेखील करतात. त्यामुळे इथं येणारे ग्राहक चहा पिऊन आनंदी होत असल्याचं चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं.