Success Story : त्यानं करून दाखवलं! कधी पेपर टाकले तर कधी पाव विकले; आता जळगावच्या विशालची BSF मध्ये निवड

Last Updated:
जळगाव (नितीन नांदुरकर, प्रतिनिधी) : शिकण्याची इच्छा होती. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विशालने कधी पेपर टाकण्याचं तर कधी पाव विकण्याचं काम केलं.
1/6
जळगाव (नितीन नांदुरकर, प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील उमाळा या गावातील विशाल ईश्वर धनगर हा तरुण सीमा सुरक्षा दलात भरती झाला आहे. विशाल लहान असतानाच वडिलांचं निधन झालं. आई आणि मोठा भाऊ मजुरी करतो.

advertisement
2/6
मात्र, अशा परिस्थितीतही विशाल धनगर या तरुणाने कठोर परिश्रम तसंच मेहनत घेत अभ्यास केला. तयारी केली आणि सर्व परिस्थितीवर मात करत सीमा सुरक्षा दलात त्याची निवड झाली आहे.

3/6
शिकण्याची इच्छा होती. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विशालने कधी पेपर टाकण्याचं तर कधी पाव विकण्याचं काम केलं. त्याने फुलं विक्रीचं दुकानही थाटलं आणि हे सगळं करत शिक्षण पूर्ण केलं. कुटुंबाची परिस्थिती बदलावी म्हणून त्याने शासकीय नोकरीचं स्वप्न बघितलं आणि त्या पद्धतीने तयारी करण्यास सुरुवात केली.

4/6
सुरुवातीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अपयश आलं. मात्र या अपयशानंतरही त्याने हार मानली नाही. त्याने जिद्दीने तयारी सुरूच ठेवली आणि अखेर त्याची सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे.

5/6
परिस्थितीवर मात करत सीमा सुरक्षा दलात निवड झालेल्या विशालचा गावकऱ्यांना मोठा अभिमान आहे. या निवडीबद्दल गावकऱ्यांनी विशालचा त्याच्या घरी जाऊन सत्कार केला.

6/6
नुकताच विशाल हा प्रशिक्षणासाठी रवाना झाला आहे. त्याच्या निवडीबद्दल त्याच्या कुटुंबाबरोबरच गावातील मित्र परिवारामध्ये मोठा आनंद आहे. कुटुंबासाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद आहे. तर दुसरीकडे देशसेवा करायला मिळणार असल्याने याचाही मोठा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विशाल याने बोलताना दिली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement