Thane Rain: गरज असेल तरच बाहेर पडा! ठाण्यात पावसाचा कहर, वाहतूक विस्कळीत, लोकलला फटका!

Last Updated:
Thane Rain: कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसाने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता अधिक आहे. आज पुन्हा कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि उपनगरांत हवामान विभागाने कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

advertisement
2/5
ठाणे शहरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. मात्र आज पहाटे पासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. शहरातील भांडुप, मुलुंड, घाटकोपर,चेंबूर, गोवंडी, मुंब्रा या परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

3/5
ठाणे शहरात सकाळी 8.30 वाजेपर्यंत 44 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे शहरांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. मुंबईसह ठाण्यातील काही ठिकाणी लोकल उशिराने धावत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

4/5
ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पूर्व द्रुतगती महामर्गावर कोपरी पूल, मुलुंड टोलनाका येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

5/5
दरम्यान, मुंबईत अंधारमय वातावरण असून दुपारी 12.38 वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी 4.64 मि उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर ठाण्यासह मुंबई आणि उपनगरांत पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement