३० नोव्हेंबरची डेडलाईन! HSRP, पेन्शनसह ही ५ कामं वेळेत करा, नाहीतर पेनल्टीसाठी पैसे तयार ठेवा

Last Updated:
पेन्शन, EKYC, HSRP, टॅक्स फॉर्म्स आणि UPS निवड यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. कामे वेळेत पूर्ण न केल्यास पेन्शन, रेशन, नंबर प्लेट, आर्थिक प्रक्रिया अडू शकतात.
1/7
शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि याचसोबत अनेक अत्यंत महत्त्वाच्या कामांची अंतिम मुदत अगदी दारात येऊन उभी आहे. जर तुम्ही पेन्शनर असाल, सरकारी कर्मचारी असाल किंवा करदाता असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी थेट आर्थिक धक्क्याची असू शकते. जीवन प्रमाणपत्र जमा करणे असो, किंवा महत्त्वाचे टॅक्स फॉर्म भरणे असो. ३० नोव्हेंबरपर्यंत जर ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर तुमची पेन्शन थांबेल, आर्थिक प्रक्रिया अडकतील किंवा मोठा दंड भरावा लागेल. त्यामुळे वेळ वाया न घालवता, ही ५ महत्त्वाची कामं आजचं करा.

advertisement
2/7
निवृत्त झालेल्या हजारो पेन्शनर्ससाठी ३० नोव्हेंबर ही तारीख खूप महत्त्वाची आहे. दरवर्षीप्रमाणे, आपली पेन्शन न चुकता खात्यात जमा व्हावी यासाठी, जीवन प्रमाण जमा करणे अनिवार्य आहे. जर हे प्रमाणपत्र जमा झाले नाही, तर डिसेंबर महिन्यापासून तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते. यावर्षी ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी १ ऑक्टोबरपासूनच प्रमाणपत्र जमा करायला सुरुवात केली आहे. तुम्ही बँक, CSC केंद्र किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या डोरस्टेप सेवेद्वारे घरबसल्या हे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बनवू शकता.

3/7
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. सरकारने ही मुदत वाढवून दिली आहे, पण आता ही शेवटची संधी आहे. UPS ही जुनी पेन्शन योजना (OPS) नाही, पण नवीन पेन्शन योजनेपेक्षा वेगळी आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बेसिक पेच्या ५०% पेन्शन मिळते. या योजनेत कर्मचारी आणि सरकार दोघांचेही योगदान निश्चित आहे (कर्मचारी १०%, सरकार १८.५%). त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना नवीन स्कीम निवडायची आहे, त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हा निर्णय घेणे बंधनकारक आहे.

4/7
नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी ही सर्व ५ महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही हे काम वेळेवर पूर्ण केले नाही, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक सुरक्षिततेवर होईल. पेन्शन थांबणे, टॅक्स संबंधित मोठ्या दंडात अडकणे किंवा महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होणे... या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या डेडलाईनकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. ३० नोव्हेंबरची ही अंतिम मुदत लक्षात ठेवा आणि तातडीने तुमची कामे पूर्ण करा.

5/7
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी देखील 30 नोव्हेंबर शेवटची तारीख देण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही HSRP साठी अर्ज केला नाही त्यांना 10 हजार दंड तर ज्यांनी अर्ज केला पण अजून नंबर प्लेट घेतली नाही त्यांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. अजूनही तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी अर्ज केला नसेल किंवा घेतली नसेल तर ती लगेच घेऊन या. यासाठी आता मुदतवाढ मिळणार नाही.

6/7
दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डसंबंधीत ज्यांनी EKYC पूर्ण केली नाही त्यांसाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. जे EKYC पूर्ण करणार नाहीत त्यांचं नाव यादीतून वगळण्यात येणार आहे. त्यांना रेशन मिळणार नाही. त्यामुळे आता रेशन दुकानावर जाऊन तुम्ही आजच ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा. नाहीतर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. तुमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचं EKYC राहिलं असेल तर त्याचं नाव वगळलं जाऊ शकतं त्यामुळे हे देखील आजच पूर्ण करा.

7/7
केवळ पेन्शनच नाही, तर अनेक महत्त्वाच्या टॅक्स (कर) संबंधित फॉर्मची डेडलाईनही ३० नोव्हेंबरच आहे. ऑक्टोबर २०२५ साठी कलम १९४-IA, १९४-IB, १९४M आणि १९४S अंतर्गत टीडीएसचा (TDS) चालान-कम-स्टेटमेंट याच तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. ज्या करदात्यांनी कलम ९२E नुसार आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत व्यवहार केले आहेत, अशा कंपन्या किंवा व्यक्तींना याच तारखेपर्यंत आयटीआर (ITR) फाइल करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतीय युनिट्सना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी फॉर्म ३CEAA ३० नोव्हेंबरपर्यंत भरावा लागेल.

Raj Thackeray :  'पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर...”
'पोटातली मळमळ ओकतायत”,‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त,“ संपूर्ण MMR...
  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

View All
advertisement