कापड दुकान बंद पडलं म्हणून कोंबड्या पाळल्या, आता महिन्याला होतेय लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शेतकरी जोडधंद्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देखील असातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संदीप मतसागर यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करून यातून लाखोंची कमाई ते करत आहेत.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते. शेतीला असे पूरक जोडधंदा हे शेतकरी करत असतात. शेतकरी जोडधंद्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देखील काढत असातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संदीप मतसागर यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करून यातून लाखोंची कमाई ते करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुक्कुट पालनाचा व्यवसाय करायचा म्हटलं तर तो कसा करावा याविषयी संदीप यांना काहीच माहिती नव्हती. यासाठी त्यांनी सर्व चौकशी केली. इतर पोल्ट्री फार्म बघितले कशे आहेत काय आहेत आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण पोल्ट्री फार्म सुरू करावा. मग संदीप यांनी आपल्या शेतामध्ये एसी पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
यासाठी त्यांना त्यांच्या भाऊ आणि वडिलांनी मदत करून हा पोल्ट्री फार्म त्यांना सुरू करून दिला. संदीप यांच्याकडे दोन शेड असलेले फॉर्म आहे. या ठिकाणी 30 ते 32 हजार एवढे पक्षी ठेवण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे हे पोल्ट्री फार्म एसी आहे. दोन महिन्यांमध्ये हे पक्षी तयार होतात. आणि नंतर ते कंपनीकडे पाठवून देतात. यातून त्यांना 2 महिन्याकाठी 4 ते 5 लाखाचं उत्पन्न मिळतं.
advertisement