China Gold: चीनने केली मोठी उलथापालथ, जगभरात गोल्ड इमर्जन्सी; भारतासाठी डेंजर सिग्नल, बाजारात येणार ‘शॉकवेव्ह’
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
China Gold Reserves: चीनने सलग 13व्या महिन्यातही प्रचंड प्रमाणात सोने खरेदी करत जागतिक बाजारात प्रचंड तणाव निर्माण केला आहे. फेडच्या बैठकीपूर्वी सोन्याच्या भावातील हालचाल आणि चीनची आक्रमक खरेदी गुंतवणूकदारांचे डोकेदुखी वाढवत आहे.
चीनने जागतिक सोन्याच्या बाजारात आणखी एक मोठे पाऊल टाकत सलग 13व्या महिन्याही सोने खरेदी करण्याचा आपला आक्रमक सिलसिला कायम ठेवला आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने (पीपल्स बँक ऑफ चायना) नोव्हेंबर महिन्यात आपल्या गोल्ड रिझर्व्हमध्ये आणखी 30,000 ट्रॉय औंसची भर घातली, ज्यामुळे त्यांचा एकूण साठा वाढून 74.12 दशलक्ष ट्रॉय औंसपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेला हा खरेदीचा सलग प्रवाह आता जागतिक बाजारातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या गोल्ड मूव्हमेंटपैकी एक मानला जात आहे. कारण सध्या सोन्याच्या किंमती विक्रमी वर्षाकडे वाटचाल करत आहेत आणि त्याच काळात चीनसारखा महाकाय देश सोन्याचा साठा इतक्या आक्रमकपणे वाढवत आहे, ही गोष्ट बाजारातील हालचालींना मोठे वळण देणारी मानली जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विश्लेषकांच्या मते या आठवड्यात फेडची धोरण घोषणा, चीन–अमेरिका आर्थिक संकेत आणि रुपयातील हालचाल हे घटक सोन्याच्या किंमतींवर थेट परिणाम करतील. सध्या जागतिक स्तरावर केंद्रीय बँकांची सोने खरेदी, तसेच व्याजदर कपात होण्याच्या वाढत्या शक्यतांमुळे सोन्याचा दीर्घकालीन कल सकारात्मकच राहील, असे त्यांचे मत आहे.
advertisement


