क्रेडिट कार्ड पाकिटात पडून आहे? सावधान, तुमच्या Credit Score ला बसू शकतो 'असा' फटका!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
आपल्याकडे अनेक क्रेडिट कार्ड्स असतात, परंतु सर्व कार्ड वापरली जातातच असे नाही. जर एखादं कार्ड तुम्ही सलग 12 महिने वापरत नसाल, तर RBI च्या नियमानुसार बँक...
आपल्यापैकी अनेकांच्या पाकिटात एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स दिसतात. शॉपिंगसाठी एक, पेट्रोलसाठी दुसरे, प्रवासासाठी तिसरे... कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्सच्या मोहापायी आपण ही कार्ड्स घेतो. पण खरंच, आपण त्या सर्वांचा दररोज वापर करतो का? अनेकदा नाही. काही कार्ड्स तर वर्षानुवर्षे आपल्या पाकिटात धूळ खात पडून राहतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, न वापरलेले क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायद्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते!
advertisement
तुम्ही वापरत नसलेले क्रेडिट कार्ड कधीही तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड सलग 12 महिने (एक वर्ष) वापरले नाही, तर बँक ते कार्ड खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. अर्थात, बँक तुम्हाला अचानक धक्का देणार नाही. कार्ड बंद करण्यापूर्वी तुम्हाला ईमेल किंवा मेसेजद्वारे सूचना दिली जाईल. जर तुम्ही सर्व देयके भरली असतील आणि 30 दिवसांच्या आत बँकेला प्रतिसाद दिला नाही, तर तुमचे कार्ड खाते अधिकृतपणे बंद केले जाईल.
advertisement
advertisement
advertisement
पण जर बँकेने तुमचे न वापरलेले दुसरे कार्ड बंद केले, तर तुमची एकूण क्रेडिट मर्यादा ₹1 लाखांवर येईल. अशा परिस्थितीतही जर तुमचा खर्च ₹30,000 असेल, तर तुमचा CUR थेट 30% होईल. लक्षात ठेवा, हा CUR जितका जास्त वाढतो, तितका त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. याचा अर्थ, भविष्यात कर्ज घेताना किंवा इतर आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
advertisement
या समस्येपासून वाचण्यासाठी एक अगदी सोपा उपाय आहे, तुमच्या प्रत्येक क्रेडिट कार्डचा वर्षातून किमान एकदा तरी वापर करा. अगदी एक छोटा मोबाइल रिचार्ज, कॉफी शॉपमधील छोटे बिल किंवा ऑनलाइन केलेली एखादी लहान खरेदीही त्यासाठी पुरेशी आहे. यामुळे तुमचे कार्ड सक्रिय राहील आणि बँक ते बंद करण्याचा विचार करणार नाही.
advertisement
तरीही, तुम्हाला तुमची सर्व कार्ड्स ठेवण्याची गरज नाही. काही कार्ड्स, विशेषतः ज्यांची वार्षिक फी जास्त आहे किंवा तुमच्याकडे आधीच खूप कार्ड्स असतील, ती बंद करणे कधीकधी फायदेशीर ठरू शकते. मात्र, कार्ड बंद करताना तुमचे सर्वात जुने क्रेडिट कार्ड ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचा क्रेडिट इतिहास जितका जास्त असेल, तितका तो तुमच्या क्रेडिट स्कोअरसाठी अधिक चांगला असतो.