एमपीएससीची तयारी, बी प्लॅन म्हणून व्यवसायात उतरले, 2 मित्रांची महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:
अजय आणि निरज हे दोघेमित्र 2015 पासून एमपीएससीची तयारी करत होते. बी प्लॅन म्हणून त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
1/7
 व्यावसायिक विश्वात मैत्रीची उदाहरणे दुर्मिळ आहेत. प्रत्यक्षात दोन भावांमध्येही व्यवसाय होत नाही. पण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती या गावात दोन मित्रांनी एकत्रित येऊन व्यावसायिक मैत्रीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

advertisement
2/7
एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन्ही मित्रांनी एकत्रित येऊन तीन वर्षांपूर्वी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस तसेच लग्न कार्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. नीरज गवळी, अजय काळुंखे यांनी मयूर या नावाने त्यांचा हा व्यवसाय सुरू केला आहे.

3/7
अजय आणि निरज हे दोघेमित्र 2015 पासून एमपीएससीची तयारी करत होते. बी प्लॅन म्हणून त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 2021 साली त्यांनी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायसेस हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. व्यवसायाची सर्व माहिती घेऊन त्यांनी 2022 साली या व्यवसायाला सुरुवात केली.

4/7
दोघा जणांनी जमा केलेले पैसे या व्यवसायामध्ये गुंतवले आणि या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायातल्या बऱ्याच गोष्टी दोघांच्या ध्यानात आल्या. व्यवसाय म्हणलं की भांडवलाची जमवाजमव, जागेचे भाडे, कामगारांचे पगार, कच्चा माल खरेदी, इतर खर्च अशा कितीतरी गोष्टी येतात.

5/7
या सगळ्याचा अभ्यास करून व्यवसायाची सगळी गणितं दोघांनी आखली. काही जणांनी हा व्यवसाय न करण्याचा देखील सल्ला दिला होता. पण कुणाचाही न ऐकता त्यांनी हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला नुकसानही झाले, पण त्यांनी हार मानली नाही ज्याचे फळ आज या दोघा मित्रांना मिळालं आहे.

6/7
अजय आणि निरज यांच्या मयूर या फर्निचरच्या दुकानांमध्ये फर्निचरसह, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम अप्लायन्सेस तसेच लग्न कार्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. व्यवसायाची मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. तसेच ग्राहकांना योग्य किंमतीत उत्तम क्वालिटीचे वस्तू मिळत असल्यामुळे या ठिकाणाहूनच ग्राहक खरेदी करतात. अजय आणि निरज या दोघा तरुणांना या व्यवसायातून महिन्याला सर्व खर्च वजा करून 1 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळत आहे.

7/7
सरकारी नोकरी हा दृष्टिकोन ठेवून चालताना भरपूर स्पर्धा आहे. तरुणांनी बी प्लान म्हणून कोणत्यातरी व्यवसाय करावा किंवा त्याचे नियोजन करावे. जेणेकरून एमपीएससीमध्ये जर आपली निवड नाही झाले तर व्यवसाय करता येईल, असा सल्ला यशस्वी उद्योजक नीरज गवळी यांनी तरुणांना दिला आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement