Success Story : वय फक्त 18 वर्षे, ऋषिकेश करतोय महिन्याला 4 लाखाची उलाढाल, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा या तरुणाच्या अंगी असल्याने आज हा तरुण त्याचा व्यवसाय सांभाळत असतो.
शिक्षणात काही मन लागत नाही, याकरता आपण स्वतःचाच व्यवसाय करू या विचाराने नाशिकमधील ऋषिकेश बोधक या 18 वर्षाच्या तरुणाने स्वतःचे मटण भाकरी सेंटर उभारले असून, दर महिन्याला 3 ते 4 लाखाची उलाढाल सुद्धा हा तरुण उद्योजक करत आहे. जे वय फिरण्या - बागडण्याचे आहे, त्या वयातच स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा या तरुणाच्या अंगी असल्याने आज हा तरुण त्याचा व्यवसाय सांभाळत असतो.
advertisement
घराची परिस्थिती हलाखीची असल्याने ऋषिकेश हा त्याच्या वडिलांसोबत इतरांच्या हॉटेलमध्ये कामाला जात असे. परंतु काही काळानंतर ऋषिकेश याच्या वडिलांनी स्वतःच्या हिमतीवर छोटे नाश्ता सेंटर सुरू केले. त्यानंतर ऋषिकेश हा त्यांच्या दुकानाला सांभाळू लागला. शिक्षणात काही गोडी नसल्याने आपण आपलाच व्यवसाय वाढवू या विचाराने दिवस-रात्र हा तरुण काम करत असे.
advertisement
advertisement
advertisement