Post Officeची जबरदस्त स्कीम! एकदा जमा करा आणि दरमहा मिळवा ₹5500
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Post Office MIS : ही योजना रिटायर्ड वरिष्ठ नागरिक आणि हाउसवाइफसाठी सर्वात फायद्याची आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागले आणि मग यातुन तुम्हाला तेच रिटर्न मिळतं जसं सोन्यात मिळत आहे.
मासिक आय योजना कोणासाठी सर्वात चांगली आहे : ही योजना रिटायर्ड वरिष्ठ नागरिक आणि हाउसवाइफसाठी सर्वात उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला 5 वर्षांसाठी एकरकमी राशी जमा करायची असते. जमा केल्याच्या तारखेपासून पोस्ट ऑफिस तुम्हाला दरमहा व्याज देणे सुरु करते. सध्या या योजनेवर 7.4% दरवर्षीचं व्याज मिळतं. जे बँकांपेक्षा जास्त आहे. तुम्ही जमा केलेली रक्कम अपरिवर्तित राहते. व्याज दरमहिने तुमच्या पोस्ट ऑफिस अकाउंटमध्ये जमा केले जाईल.
advertisement
उदाहरणार्थ, तुम्ही ₹1 लाख गुंतवले तर तुम्हाला दरमहा अंदाजे ₹616 व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही ₹5 लाख गुंतवले तर तुम्हाला दरमहा अंदाजे ₹3,083 व्याज मिळेल. गुंतवलेल्या रकमेवर आधारित तुम्हाला व्याज मिळेल. तुम्ही या योजनेत फक्त ₹1,000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता. कमाल मर्यादा नाही. तुम्ही एका व्यक्तीच्या नावाने खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त ₹9 लाख जमा करू शकता. जर तुम्ही दोन किंवा तीन लोकांसह (म्हणजेच संयुक्त खाते) खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त ₹15 लाख गुंतवणूक करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी रकमेपासून सुरुवात करणे सोपे आहे. तुम्ही फक्त ₹1,000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता. एक व्यक्ती त्यांच्या नावाने एकापेक्षा जास्त खाती उघडू शकते, परंतु सर्व खात्यांमध्ये एकूण गुंतवणूक ₹9 लाखांपेक्षा जास्त नसावी. संयुक्त खात्याचा पर्याय देखील आहे, जिथे दोन किंवा तीन लोक ₹15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
advertisement
गुंतवणूकदारांना कुटुंबातील सदस्याला नॉमिनी करण्याचा पर्याय आहे. ज्यामुळे त्यांना अनपेक्षित घटना घडल्यास सहजपणे पैसे मिळवता येतात. शिवाय, ते त्यांच्या ठेवी पोस्ट ऑफिस आरडी योजनेत देखील ट्रान्सफर करू शकतात, ज्यामुळे जास्त व्याज आणि चांगले रिटर्न मिळण्याची संधी मिळते. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे.
advertisement








