BBM6: पहिलंच नॉमिनेशन टास्क अन् घरात वादळ! तन्वी-सागरनंतर सोनाली-रोशनमध्ये पेटलं, नक्की काय घडलं?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 First Nomination Task: मकर संक्रांतीचं औचित्य साधून बिग बॉसने घरात 'नॉमिनेशनचा पतंग' हा टास्क दिला होता. त्यानंतर घरामध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू झाला.
1/7
'बिग बॉस मराठी ६' चं घर म्हणजे स्पर्धकांच्या भावनांचा रोलर-कोस्टरच. कधी इथे मैत्रीचे नाते पाहायला मिळते, तर कधी एकमेकांमधली शत्रू भावना. मकर संक्रांतीचं औचित्य साधून बिग बॉसने घरात 'नॉमिनेशनचा पतंग' हा टास्क दिला होता.

advertisement
2/7
घराबाहेर जाण्याच्या या पहिल्याच लढाईत मैत्रीचा मांजा कच्चा ठरला असून या टास्कमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. अभिनेत्री सोनाली राऊतने थेट रोशन भजनकरचा पत्ता कट करत त्याचा पतंग कापला आणि घरामध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू झाला.

3/7
नॉमिनेशन कार्यासाठी गार्डन एरियामध्ये सर्व स्पर्धकांचे फोटो असलेले पतंग लावले होते. जो स्पर्धक दुसऱ्याचा पतंग कापेल, ती व्यक्ती घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार होती. जेव्हा सोनालीची वेळ आली, तेव्हा तिने कोणताही विचार न करता थेट रोशनच्या पतंगावर वार केला.

4/7
पतंग कापताना सोनालीने जे कारण दिलं, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोनाली म्हणाली,
पतंग कापताना सोनालीने जे कारण दिलं, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोनाली म्हणाली, "इतर स्पर्धकांच्या मानाने रोशनचं या घरातलं कॉन्ट्रिब्युशन शून्य आहे. तो कुठेच दिसत नाहीये, त्यामुळे त्याला नॉमिनेट करणं मला योग्य वाटतं."
advertisement
5/7
सोनालीचा हा वार रोशनच्या जिव्हारी लागला. शांत वाटणारा रोशन अचानक आक्रमक झाला. त्याने सोनालीच्या शहरी राहणीमानावर आणि तिच्या वृत्तीवर थेट निशाणा साधला. रोशन संतापून म्हणाला,
सोनालीचा हा वार रोशनच्या जिव्हारी लागला. शांत वाटणारा रोशन अचानक आक्रमक झाला. त्याने सोनालीच्या शहरी राहणीमानावर आणि तिच्या वृत्तीवर थेट निशाणा साधला. रोशन संतापून म्हणाला, "शहरातल्या लोकांचं हेच काम असतं. स्वतःला वर नेण्यासाठी दुसऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा. तुम्हाला माणसांची किंमत नाहीये."
advertisement
6/7
रोशन एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोनालीला टोला लगावत म्हटलं,
रोशन एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोनालीला टोला लगावत म्हटलं, "कदाचित या घरात कसं वागायचं आणि कोणाचे पाय खेचायचे, याचं ट्युशन आता तुमच्याकडूनच घ्यावं लागेल." रोशनच्या या आक्रमकतेसमोर सोनालीने मात्र आपला स्टॅण्ड बदलला नाही.
advertisement
7/7
सोनाली आणि रोशनमधील या वादामुळे घरातील इतर सदस्यही बुचकळ्यात पडले आहेत. एका बाजूला सोनालीचा स्पष्टवक्तेपणा आहे, तर दुसऱ्या बाजूला रोशनची भावनिक बाजू. शहरा विरुद्ध गाव असा हा वाद आता घरामध्ये गटबाजीला निमंत्रण देणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement