Share Market: मैदानात हिटमॅन, शेअर बाजारात किंग! रोहित शर्माने ९००% रिटर्न देणाऱ्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये लावला मोठा डाव
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रोहित शर्मा, तिलक वर्मा, संतोष अय्यर आणि अभिषेक नायर यांनी स्वराज सूटिंगच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असून या स्टॉकने ५ वर्षांत ९०० टक्के रिटर्न दिला आहे.
बॉलिवूड स्टार, व्यावसायिक उद्योजकांप्रमाणेच आता भारतीय क्रिकेटपटूही शेअर बाजारात मोठ्या आत्मविश्वासाने आपली गुंतवणूक करत आहेत. मैदानातील यशस्वी कामगिरीनंतर, शेअर मार्केटमध्ये अनेक खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये भारतीय संघाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा कर्णधार रोहित शर्मा याचे नाव आघाडीवर आहे, जो आता गुंतवणुकीच्या विश्वातही आपली ओळख निर्माण करत आहे.
advertisement
advertisement
रोहित शर्मासोबतच, तिलक वर्मा यानेही या स्टॉकमध्ये पैसे लावले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे या शेअरकडे लक्ष वेधले गेले असून, आगामी काळात यात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. या दोघांमुळे त्यांचे चाहते देखील आता या शेअर्सवर लक्ष ठेवून आहेत. या शेअरची किंमत वाढली तर यामध्ये पैसे लावणाऱ्यांची चांदी होणार आहे.
advertisement
स्वराज सूटिंग कंपनीने प्रेफरेंशियल बेसिसवर प्रति शेअर २३६ रुपये किमतीला ४३,७६,५०० शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्या १९८ गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स वाटप करण्यात आले आहेत, त्यामध्ये रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यासह श्रेयस अय्यरचे वडील संतोष व्यंकटेश्वरन अय्यर आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक अभिषेक मोहन नायर यांचाही समावेश आहे.
advertisement
जर या प्रेफरेंशियल इश्यूला कंपनीच्या भागधारकांकडून आणि नियामक प्राधिकरणांकडून मंजुरी मिळाली, तर कंपनी या माध्यमातून सुमारे १०३.२८ कोटी रुपये उभे करू शकते. या मोठ्या रकमेचा उपयोग कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी करणार आहे.
advertisement
advertisement
advertisement


