शेअर मार्केट, सोन्यापेक्षा जास्त रिटर्न, 10 महिन्यात चांदीने केलं मालामाल, आता खरेदी केलं तरी फायदा होईल का?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव १,३१,८०० रुपये तर चांदीचे १,८२,००० रुपये प्रति किलोवर. मागणी वाढ, पुरवठ्यात घट आणि औद्योगिक वापरामुळे दरात तुफानी तेजी.
देशात सोने आणि चांदीच्या भावांना अक्षरशः 'आग' लागली आहे. सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी तेजी कायम राहिली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे भाव १,००० रुपयांनी वाढून १,३१,८०० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. दुसरीकडे, चांदीचे दर मंगळवारी गाठलेल्या १,८५,००० रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवरून थोडे खाली आले असले, तरी ते आजही १,८२,००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
advertisement
चांदीच्या दरातील ही वाढ गुंतवणूकदारांसाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे. गेल्या फक्त दहा महिन्यांमध्ये चांदीचे भाव दुप्पट झाले आहेत! विशेष म्हणजे, या काळात चांदीने सोन्याच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी जास्त परतावा दिला आहे. चांदीमध्ये आलेली ही 'तुफानी तेजी' पाहून आता सर्वजण याचे कारण आणि भविष्यातील दिशा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
advertisement
advertisement
advertisement
पुरवठ्यात मोठी घट: मागणी वाढली असताना चांदीचा पुरवठा मात्र पुरेसा होत नाहीये. जगातील अनेक देशांत पर्यावरण नियमांमुळे किंवा खाणी बंद झाल्यामुळे नियोजित उत्खनन कमी झाले आहे. विशेष म्हणजे, ७० टक्के चांदी ही तांबे आणि जस्त सारख्या धातूंच्या उत्खननादरम्यान 'बाय-प्रॉडक्ट' म्हणून मिळते. जोपर्यंत तांब्याचे उत्खनन वाढत नाही, तोपर्यंत चांदीचा पुरवठा वाढू शकत नाही, ज्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे.
advertisement
चांदीचे दर सध्या विक्रमी उच्चांकावर असल्यामुळे, तज्ज्ञांनी आता आक्रमक खरेदी (Aggressive Buying) टाळण्याचा सल्ला दिला आहे. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांचे म्हणणे आहे की, चांदीचे भाव दुप्पट झाले आहेत, त्यामुळे आता आक्रमक खरेदी करणे योग्य नाही. मात्र, दीर्घकालीन विचार केल्यास सोन्यापेक्षा चांदीमध्ये जास्त वाढ होण्याची शक्यता त्यांना वाटते.
advertisement