Aadhar Card Update: तुमची एक चूक अन् सगळा डेटा लिक होऊ शकतो! Aadhaar ने दिला हायअलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
UIDAI ने ई-आधार सार्वजनिक संगणकावर डाउनलोड न करण्याचा इशारा दिला आहे. आधारची माहिती सुरक्षित ठेवणे आणि सायबर फसवणुकीपासून बचाव करणे आवश्यक आहे.
बऱ्याचदा आपण साइट आवडली की लगेच आपले डिटेल्स देतो आणि त्यातून फ्रॉड होतो असे प्रकार पाहिजे असतील, मात्र आता आधार कार्डचे नवीन फ्रॉड होत आहेत. आधार कार्डचं नवीन अॅप आल्यानंतर आता अधिक सुरक्षित आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आधार कार्डची माहिती वापरून फ्रॉड होत असल्याच्या घटना घडत आहेत. याला कारणीभूतही आपणच ठरू शकतो ते कसं हे आधारने ट्विट करून स्वत;सांगितलं आहे.
advertisement
advertisement
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नागरिकांना याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. UIDAI ने स्पष्टपणे सांगितले आहे की, इंटरनेट कॅफेसारख्या सार्वजनिक संगणकावर तुमचे ई-आधार डाउनलोड करणे टाळा. जर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तेथे आधारची कॉपी डाउनलोड करावी लागली, तर ती डाऊनलोड करुन झाल्यावर संगणकातून कायमस्वरूपी डिलीट करायला विसरू नका.
advertisement
advertisement
advertisement
तुमच्या आधार कार्डचा किंवा अन्य गोपनीय माहितीचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास, तुम्ही तात्काळ संबंधित यंत्रणांकडे तक्रार नोंदवू शकता. सायबर-गुन्हे हेल्पलाइन १९३०, UIDAI हेल्पलाइन १९४७ किंवा help@uidai.gov.in या वेबसाइटवर तुमची तक्रार नोंदवू शकता. UIDAI ने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्याचे आवाहन केलं आहे.


