विकेण्डला जुहू चौपाटीला जायचा प्लॅन होणार चौपट, मरिन्सलाही नका जाऊ, BMC ने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
BMC ने 4 ते 7 डिसेंबर दरम्यान मरीन ड्राईव्ह, नरेमन, दादर चौपाटी, वर्सोवा चौपाटीवर हायअलर्ट जारी केला आहे. समुद्रात 5.3 मीटरपर्यंत उंच लाटा येणार आहेत. सतर्क राहा.
विकेण्डला फिरायला किंवा संध्याकाळी सहज म्हणून फेरफटका मारायला मरीन ड्राईव्ह, नरेमन किंवा दादर चौपाटी, वर्सोवा चौपाटीला जायचा प्लॅन असेल तर सावधान! तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. BMC ने हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळे तुमचा हा प्लॅन होल्ड करा किंवा BMC ने दिलेल्या वेळा पाहून बाहेर पडा. सध्या हवामानात मोठे बदल होत आहेत.
advertisement
advertisement
समुद्रात 5.3 मीटर इतक्या उंच लाटा येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. समुद्रात हाय टाइड असल्याने न जाण्याचं आवाहन केलं आहे. BMC डिझास्टर मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार 6 डिसेंबर रोजी रात्री 12.39 वाजता 5.3 उंच लाटा येणार आहेत. त्यामुळे नाईट आऊटचा प्लॅन तुमच्या मुंबईच्या समुद्रावर किंवा मरिन ड्राईव्हवर असेल तर आताच सावध राहा.
advertisement
advertisement
advertisement


