"14 कोटी महिन्यात परत करू!" कोथरूड फसवणूक प्रकरणातील आरोपींची कोर्टात लेखी हमी, पण 'ही' अट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
फिर्यादी दिपक पुंडलीकराव डोळस यांच्याकडून उकळलेले हे संपूर्ण पैसे कारागृहातून सुटल्यानंतर ३० दिवसांच्या आत परत करण्यास आपण तयार आहोत, असं आरोपींनी न्यायालयात सादर केलेल्या हमीपत्रामध्ये नमूद केलं आहे.
पुणे : पुण्यातून फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या मुलींचं आजारपण बरं करण्याचं आमिष दाखवून कोथरूड येथील एका संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीची तब्बल १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील आरोपींनी न्यायालयात एक महत्त्वपूर्ण लेखी हमीपत्र सादर केलं आहे.
३० दिवसांत पैसे परत
फिर्यादी दिपक पुंडलीकराव डोळस यांच्याकडून उकळलेले हे संपूर्ण पैसे कारागृहातून सुटल्यानंतर ३० दिवसांच्या आत परत करण्यास आपण तयार आहोत, असं आरोपींनी न्यायालयात सादर केलेल्या हमीपत्रामध्ये नमूद केलं आहे.
या गुन्ह्यात मुख्य आरोपी वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय ४१), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय ४२, दोघे रा. कोथरूड) आणि दीपक जनार्दन खडके (वय ६५, रा. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांच्यासमोर हजर करण्यात आलं. सरकारी वकील मकरंद औरंगाबादकर आणि फिर्यादीचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे.
advertisement
1139 संशयित व्यवहार उघड
पोलिसांच्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपींच्या 39 बँक खात्यांची माहिती तपासली असता, फिर्यादीने त्यांच्या विविध खात्यांवर मोठी रक्कम पाठवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आरोपींनी फसवणुकीतून मिळवलेले १४ कोटी ३९ लाख रुपये विविध ठिकाणी फिरवले असून, त्यातून मालमत्ता आणि वाहने खरेदी केल्याचे दिसून आले आहे.
advertisement
आरोपींनी केलेले एकूण एक हजार १३९ व्यवहार संशयित आढळले आहेत. विशेष नोंदणी व महानिरीक्षक यांच्याकडूनही ६ ते ७ विविध मालमत्ता नोंदींचे दस्तऐवज पोलिसांना प्राप्त झाले आहेत. यामुळे आरोपींनी फसवणुकीचे पैसे कोणत्या मालमत्तांमध्ये गुंतवले आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 04, 2025 2:04 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
"14 कोटी महिन्यात परत करू!" कोथरूड फसवणूक प्रकरणातील आरोपींची कोर्टात लेखी हमी, पण 'ही' अट


