Interesting Facts : जगातील अशी 5 ठिकाणं जिथे माणसांना जाण्यास आहे बंदी! पण इथे असं काय रहस्य दडलंय?

Last Updated:
places in the world which are banned for normal people : जगात अशी अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत जिथे पर्यटक मोठ्या संख्येने जातात. मालदीवचे निळे समुद्र, स्वित्झर्लंडचे बर्फाच्छादित डोंगर किंवा काश्मीरच्या बर्फाळ खोऱ्या. पण त्याच वेळी पृथ्वीवर अशीही काही ठिकाणे अशीही आहेत, जी इतकी रहस्यमयी, धोकादायक किंवा मौल्यवान आहेत की तिथे सामान्य माणसाला पाय ठेवण्याची परवानगीच नाही. ही ठिकाणे निसर्गरक्षण, मानवी सुरक्षितता, वैज्ञानिक संशोधन किंवा प्राचीन वारसा वाचवण्यासाठी बंद केली आहेत. चला तर मग पाहूया अशा पाच रहस्यमयी ठिकाणांची माहिती.
1/5
सर्टसी आइसलँड : सन 1963-1967 दरम्यान ज्वालामुखीच्या उद्रेकातून अटलांटिक महासागरातून अचानक निर्माण झालेले हे बेट आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्ग कसा विकसित होतो हे अभ्यासण्यासाठी आइसलँड सरकारने येथे मानवी प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे. फक्त खास परवानगी असलेले काही शास्त्रज्ञच येथे पाय ठेवू शकतात. 2008 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले.

advertisement
2/5
स्नेक आयलंड (इल्हा दा क्वेमादा ग्रांदे), ब्राझील : साओ पाउलो किनारपट्टीपासून 35 किमी दूर असलेल्या या बेटावर जगातील सर्वात विषारी साप - गोल्डन लान्सहेड वायपर, हजारोंच्या संख्येने आढळतात. यांच्या एकाच दंशात माणसाचा जीव जाऊ शकतो. जनसुरक्षितता आणि या दुर्मीळ प्रजातीच्या संरक्षणासाठी ब्राझील सरकारने सर्वसामान्यांसाठी येथे पूर्णपणे बंदी घातली आहे. फक्त परवानगी असलेले शास्त्रज्ञच येथे जाऊ शकतात.

3/5
एरिया 51, अमेरिका : नेवाडा वाळवंटातील हे अमेरिकेचे अत्यंत गुप्त लष्करी तळ आहे. प्रगत विमाने आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या चाचण्या येथे होतात. मोशन सेन्सर्स, सशस्त्र गस्त आणि हवाई देखरेख यामुळे येथे प्रवेश करणे अशक्य आहे. जवळ जाणाऱ्यांनाही कठोर शिक्षा होते. यामुळेच एरिया 51 जगातील सर्वात रहस्यमयी ठिकाण मानले जाते.

4/5
लास्को गुहा, फ्रान्स : 17,000 वर्षांपूर्वीच्या प्रागैतिहासिक भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध ही गुहा 1940 मध्ये सापडली. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांच्या श्वासातील आर्द्रता आणि बुरशीमुळे चित्रे खराब होऊ लागल्याने 1963 मध्ये फ्रान्स सरकारने ती कायमची बंद केली. आज फक्त मोजक्या शास्त्रज्ञांनाच नियंत्रित वातावरणात प्रवेश मिळतो. पर्यटकांसाठी येथे लास्को - 2, 3 आणि 4 अशा हुबेहूब प्रतिकृती बनवल्या आहेत.

5/5
उत्तर सेंटिनल बेट, भारत : बंगालच्या उपसागरातील हे बेट सेंटिनली जमातीचे घर आहे. ही जमात हजारो वर्षांपासून बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त आहे. बाहेरील व्यक्तींमुळे त्यांच्यापर्यंत रोग पसरण्याचा धोका आहे. कारण त्यांच्याकडे आधुनिक रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती नाही. त्यांच्या संरक्षणासाठी आणि बाहेरील व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने येथे प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे. बेटाजवळ गेलेल्या अनेक लोकांना या जमातीने बाण मारले आहेत.

Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement